sania mirza shoaib malik seperated before marriage she was dating with shahid kapoor | शोएब मलिकशी लग्नाआधी सानिया मिर्झा शाहिद कपूरला करत होती डेट, पण ब्रेकअप झालं अन्... | Loksatta

शोएब मलिकशी लग्नाआधी सानिया मिर्झा शाहिद कपूरला करत होती डेट, पण ब्रेकअप झालं अन्…

सानिया मिर्झा आणि शाहिद कपूर यांच्या अफेअरच्या रंगल्या होत्या जोरदार चर्चा

Sania Mirza,hoaib Malik,Shahid Kapoor,Sania Mirza divorce, Shoaib Malik Divorce, Shoaib Malik married life, Sania Mirza affairs, Sania Mirza divorce news, Sania Mirza shahid kapoor dating, Sania Mirza love affair, shahid kapoor dating sania, tenis star, Sania Mirza shahid kapoor relationship, koffee with karan, सानिया मिर्झा, शाहिद कपूर, सानिया मिर्झा घटस्फोट, शोएब मलिक, शोएब मलिक घटस्फोट, सानिया मिर्झा अफेयर, शाहिद कपूर सानिया मिर्झा डेटिंग, सानिया मिर्झा शाहिद कपूर रिलेशनशिप, टेनिस स्टार, कॉफी विद करण, करण जोहर
सानिया मिर्झाच्या लव्ह लाइफबद्दल एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आली आहे.

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाच्या वैवाहिक आयुष्यात बरीच उलथापलथ झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून सानिया आणि तिचा पती शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. आता शोएब आणि सानियाच्या विश्वासू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दिल्याचं बोललं जात आहे. अशात आता सानिया मिर्झाच्या लव्ह लाइफबद्दल एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आली आहे.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. दोघंही सोशल मीडियावरही एकमेकांबरोबर फोटो शेअर करताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वीच सानियाने एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता सानिया मिर्झाची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या मुलाखतीत सानिया मिर्झा बॉलिवूडचा कबीर सिंह अर्थात शाहिद कपूरबद्दल बोलली होती.

आणखी वाचा- सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब? जवळच्या व्यक्तीने केला खुलासा

‘कॉफी विथ करण’च्या एका एपिसोडमध्ये सानिया मिर्झाला करण जोहरने शाहिद कपूरसह तिच्या रिलेशनशिपबाबत एक बेधडक प्रश्न विचारला होता. या शोमध्ये सानिया मिर्झा फराह खानबरोबर सहभागी झाली होती. करण जोहरने सानियाला विचारलं, “तुला कधी कोणत्या बॉलिवूड अभिनेत्याने डेटिंगसाठी विचारलं होतं का?” त्यावर सानियाने याला नकार दिला. पण करणने शाहिद आणि तिच्या डेटिंगच्या चर्चांबद्दल बोलताना, “त्या चर्चा खऱ्या होत्या का?” असा प्रश्न विचारला होता. त्यावर सानियाने खूपच धम्माल उत्तर दिलं होतं. ती म्हणालेली, “मला आठवत नाही हे सगळं खूप पूर्वीचं आहे. असं काही घडलं नसावं कारण मी खूप प्रवास करते.”

दरम्यान सानिया मिर्झा आणि शाहिद कपूरने २००९ मध्ये एकमेकांच्या जवळ आले होते. करीना कपूरशी ब्रेकअप झाल्यानंतर सानिया मिर्झा आणि शाहिद कपूर एकत्र अले होते. दोघंही एका कॉमन मित्राच्या पार्टीमध्ये एकमेकांना भेटले होते. सुरुवातीला मैत्री आणि मग त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनीही त्यांचं नातं लपवण्याचा प्रयत्न केला होता मात्र नंतर ते एकत्र बऱ्याच कार्यक्रमात दिसले होते. पण दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल जाहीरपणे बोलणं नेहमीच टाळलं होतं.

आणखी पाहा- सानिया मिर्झा-शोएब मलिक १२ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेणार? चर्चांदरम्यान लग्नाचे फोटो व्हायरल

‘कमिने’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, सानिया आणि शाहिद एका हॉटेलमध्ये एकत्र स्पॉट झाले होते जिथे त्यांनी एकत्र काही वेळ घालवला. पण खेळ आणि बॉलिवूडला जोडणारं हे नातं फार काळ टिकलं नाही आणि दोघांनी आपलं नातं संपवण्याचा निर्णय घेतला. सानिया मिर्झा शाहिदच्या स्वभावाला कंटाळली होती. शाहिद सानियाच्या बाबतीत खूपच पझेसिव्ह होता तर सानियाला तिची पर्सनल स्पेस हवी होती असं बोललं जातं. त्यामुळेच या दोघांचं ब्रेकअप झालं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-11-2022 at 09:30 IST
Next Story
आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या लेकीची पहिली झलक? व्हायरल फोटो व व्हिडीओमागचं सत्य समोर