Sanjay Dutt Alta Stella Restaurant : शिल्पा शेट्टी, शंकर महादेवन, मलायका अरोरा, अर्पिता खान अशा बहुतांश बॉलीवूड सेलिब्रिटींनी मुंबईत स्वत:ची आलिशान रेस्टॉरंट्स सुरू केली आहेत. काही महिन्यांपूर्वीच बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तने सुद्धा अंधेरी पश्चिम परिसरात एक आलिशान रेस्टॉरंट लॉन्च केलं. त्याच्या या रेस्टॉरंट नाव आहे Alta Stella.

संजय दत्तचं हे हॉटेल ३० व्या मजल्यावर असून याठिकाणाहून संपूर्ण जवळपासच्या परिसराचा खूपच सुंदर व्ह्यू पाहायला मिळतो. लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनिशा दीक्षित मुंबईतल्या नावाजलेल्या रेस्टॉरंटमध्ये भेट देत असते आणि याठिकाणांचे Honest रिव्ह्यू ती चाहत्यांबरोबर शेअर करते. काही दिवसांपूर्वीच अनिशा संजय दत्तच्या Alta Stella रेस्टॉरंटमध्ये गेली होती. यावेळी तिने संपूर्ण हॉटेलची झलक चाहत्यांना दाखवली. इथून दिसणाऱ्या व्ह्यूचं भरभरून कौतुक सुद्धा केलं. यानंतर अनिशाने संजय दत्तच्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या बेस्ट चार पदार्थांचा आस्वाद घेतला.

अनिशाने Alta Stella च्या मॅनेजरला संजय दत्तला इथला कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडतो याबद्दल विचारलं आणि तिच डिश सर्व्ह करायला सांगितली. यावेळी संजू बाबाला Alta Stella मधील वडापाव सर्वात जास्त आवडत असल्याचं मॅनेजरने सांगितलं आणि ही खास डिश अनिशाला सर्व्ह केली. याच दरम्यान, सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं ते या वडापावच्या किमतीने…झोमॅटो आणि Alta Stella च्या मेन्यू कार्डमध्ये नमूद केल्यानुसार संजय दत्तच्या हॉटेलमध्ये वडापाव ५२५ रुपयांना मिळतो. मोठा पाव आणि याबरोबर ४-५ मिनी वडे सर्व्ह केले जातात. आपण नेहमी खातो…त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने हा वडापाव सर्व्ह केला जातो.

तर, अभिनेत्याच्या हॉटेलमध्ये मिसळ पाव, Alta स्टाइल मॅगी याची किंमत अनुक्रमे ५४५ आणि ४९५ रुपये इतकी आहे. संजय दत्तच्या हॉटेलमध्ये इटालियन, नॉर्थ इंडियन, इंडो-चायनीज पदार्थ सर्व्ह केले जातात.

Alta Stella menu card
Alta Stella रेस्टॉरंटच्या मेन्यू कार्डची झलक

दरम्यान, संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, त्याने ‘धुरंधर’च्या दोन्ही भागांमध्ये साकारलेल्या चौधरी अस्लम खान यांच्या भूमिकेची बरीच चर्चा झाली. आता आगामी काळात अभिनेता ‘द गूड महाराजा’, ‘खलनायक रिटर्न्स’ यांसारख्या सिनेमांमध्ये झळकणार आहे.