बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. आज संजय दत्त लग्नाचा १५ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात संजय दत्त आणि मान्यता अमिताभ बच्चन यांच्या ‘कालिया’ चित्रपटातील ‘तुम साथ हो जब अपने’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. पण या व्हिडीओमुळे संजय दत्तला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

मान्यता दत्तही संजय दत्तची तिसरी पत्नी आहे. लग्नाच्या १५ व्या वाढदिवच्या निमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दोघंही ‘तुम साथ हो जब अपने’ या गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना मान्यताने कॅप्शनमध्ये लिहिलं, “२१ वर्षे झाली… आम्ही चुका केल्या, आम्ही माफी मागितली, एकमेकांना दुसरी संधीही दिली, एकमेकांना माफ केलं, आम्ही मज्जा मस्तीही केली. आम्ही खूप ओरडलो, आम्ही हिंमतही ठेवली आणि प्रेमही केलं. लग्नाच्या १५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!”

Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Ajit Pawar and Sanjay Raut
Sanjay Raut : “अजित पवार भावी किंवा माजी नाही, ते सदैव…”, उपमुख्यमंत्री पदावरून संजय राऊतांचा टोला!
amitabh bachchan reaction after seeing vitthal murti
Video: गर्दीत चाहत्याने आणलेली विठ्ठलाची मूर्ती पाहिली अन्…; अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेचं होतंय कौतुक
zee marathi lakhat ek amcha dada and shiva serial actors dance together
नवरी नटली…; ‘झी मराठी’च्या दोन लोकप्रिय मालिकेतील कलाकारांचा जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “सगळे स्वत:च्या धुंदीत…”
Pushpa 2 allu arjun and rashmika sooseki Dance Video
“अंगारो सा…”, अल्लू अर्जुन अन् रश्मिकाचा ‘सुसेकी’ गाण्यावर जबरदस्त डान्स! पुष्पा-श्रीवल्लीची केमिस्ट्री पाहून नेटकरी म्हणाले…

आणखी वाचा- Bigg Boss 16 Finale आधी शिव ठाकरेचं नशीब चमकलं, रोहित शेट्टीकडून मिळाली मोठी ऑफर

मान्यता दत्तच्या या पोस्टवर संजय दत्तची मोठी मुलगी त्रिशाला दत्तनेही कमेंट केली आहे. “लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा” अशी कमेंट तिने या पोस्टवर केली आहे. त्रिशालाच्या या कमेंटवर मान्यतानेही रिप्लाय दिला आहे. “धन्यवाद माय लव्ह, तुझी खूप आठवण येते.” असं तिने रिप्लाय देताना लिहिलं आहे. याशिवाय चित्रपटसृष्टीतील अनेकांनी यावर कमेंट करत संजय आणि मान्यताला शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा- वयाच्या ६१ व्या वर्षी संजय दत्तने केली होती कॅन्सरवर मात; स्टेज ४ कॅन्सर असतानाही कसा केला पराभव जाणून घ्या

पण नेटकऱ्यांना मात्र संजय दत्तचा हा अंदाज फारसा आवडलेला नाही आणि त्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिलं, “तो मान्यताला किती जोरात धक्का देत आणि किती जोरात स्वतःकडे खेचत आहे. हा कसला डान्स आहे?” दुसऱ्या युजरने कमेंटमध्ये लिहिलं, “हे दोघंही जरा जास्तच नशेत आहेत असं वाटत नाही का?” तर आणखी एका युजरने, “असं वाटतंय की संजय दत्त फारसा डान्स करण्याच्या मूडमध्ये नाही असं दिसतंय” अशी कमेंट केली आहे. याशिवाय काहींनी तर संजय दत्त नशेत असल्याचंही कमेंटमध्ये म्हटलं आहे.

Story img Loader