माधुरी दीक्षित व संजय दत्त एकमेकांना डेट करत होते असं म्हटलं जातं. त्यामुळे याबद्दल एकदा करण जोहरने ‘कॉफी विथ करण’मध्ये थेट संजय दत्तला प्रश्नही विचारला होता. करणने संजय दत्तला तुझं आजही माधुरीवर प्रेम आहे का असं विचारलं होतं ज्यावर त्याने हो असं उत्तर दिलं होतं. महत्त्वाचं म्हणजे त्याने माधुरीला मुलांची काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.

संजय दत्त माधुरीबद्दल काय म्हणालेला?

‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात संजय दत्तने अनिल कपूर यांच्याबरोबर हजेरी लावली होती. ज्यावेळी दोघांनाही माधुरीबद्दल विचारण्यात आलं होतं. दोघांनीही माधुरीबद्दल प्रतिक्रिया दिली होती. संजय दत्तला करण जोहरने तुझं आजही माधुरीवर प्रेम आहे का असं विचारलं असता संजय दत्त म्हणला, “हो”. त्यानंतर त्याने संजय दत्तला ती भारतात परतली आहे तू तिला भेटला आहेस का? असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “नाही अजून भेटलो नाहीये. मला फक्त तिला एवढं सांगायचं आहे की घरी परत जा आणि मुलांची काळजी घे.”

माधुरीच्या पती व मुलांबद्दलही दिलेली प्रतिक्रिया

करणने पुढे संजय दत्तला विचारलं की तुला तिने मुंबईत असायला नकोय का? त्यावर तो म्हणाला, “मुलांबरोबर राहा आता काय अभिनय करायचा”. त्यावर तिथे उपस्थित अनिल दत्त म्हणाले, “असं नको बोलू यार असं का पाठवतोय?” त्यावर संजय दत्त म्हणाला, “नाही पाठवत नाहीये.” करणने याच मुलाखतीत पुढे संजय दत्तला तिने डॉक्टरबरोबर लग्न केलं आहे आणि ती आता तिच्या आयुष्यात स्थिरावली आहे याचा तुला आनंद आहे का? असं विचारलं. त्यावर संजय दत्त म्हणाला, “हो मी नुकताच शिकागोमध्ये मुलांना भेटलो” त्यावर करणने तू तुझ्या मुलांनासुद्धा तिची भेट घालून दिली पाहिजे आणि मान्यताला (संजय दत्तची पत्नी) माधुरीला भेटायला आवडेल का असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “हो मला आवडेल आणि मान्यतालाही तिला भेटायला आवडेल.”

माधुरी दीक्षित व संजय दत्त १९९०च्या दरम्यान एकमेकांबरोबर रिलेशनशिपमध्ये होते आणि १९९३मध्ये जेव्हा संजय दत्तला अटक झाली तेव्हा ते वेगळे झाले असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढे १९९९मध्ये माधुरीने परदेशात स्थायिक असलेले डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. बरीच वर्षे तिकडे संसार केल्यानंतर २०११मध्ये ती तिच्या कुटुंबासह भारतात परती आणि आता ते इथेच स्थायिक झाले आहेत.

दरम्यान, करण जोहरने अलीकडेच त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोच्या शेवचटच्या सीझनची घोषणा केली. लवकरच येत्या १४ ऑक्टोबरला कॉफी विथ करण सीझन ९ सुरू होणार आहे. त्यामुळे या सीझनमध्ये कोणते सेलिब्रिटी झळकणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.