Sanjay Dutt Post : बॉलीवूड अभिनेता संजय दत्तची लाडकी लेक त्रिशाला दत्त हिचा आज वाढदिवस आहे. त्रिशाला आता ३६ वर्षांची झाली आहे. त्यामुळे त्रिशाला हिला बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी शुभेच्छा देताना दिसत आहेत. संजय दत्तच्या मुलीने झगमगत्या दुनियेपासून दूरचं करिअर निवडलं आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फॉलोवर्स देखील मोठ्या प्रमाणत आहेत. आज त्रिशालाच्या वाढदिवसानिमित्ताने संजय दत्तने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे; जी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. लाडक्या लेकीच्या वाढदिवसानिमित्ताने संजय दत्तने ( Sanjay Dutt ) तिचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बालपणीची गोंडस त्रिशाला संजय दत्तच्या मांडीवर बसलेली पाहायला मिळत आहे. लाल व पांढऱ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये त्रिशाला फारच सुंदर दिसत आहे. तिच्या निरागसतेने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. हा गोड फोटो शेअर करत संजय दत्तने त्रिशालाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हेही वाचा - विजय कदम यांच्या निधनावर प्रशांत दामलेंची भावुक प्रतिक्रिया, म्हणाले, “परवापर्यंत आम्ही…” संजय दत्तने ( Sanjay Dutt ) लिहिलं आहे, "माझी राजकुमारी, तुझा बाप झाल्याने मी किती धन्य झालो आहे, हे मला तुझ्या या खास दिवसानिमित्ताने आठवतं. तुझं प्रेम माझ्या आयुष्याला इतकं प्रकाशमय करत की ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्रिशाला तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मला तुझा खूप अभिमान आहे." संजय दत्तच्या या पोस्टवर बॉलीवूडच्या कलाकार मंडळींसह चाहत्यांनी त्रिशालाला शुभेच्छा दिल्या आहेत. हेही वाचा – ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतून खुशबू तावडेची ‘या’ कारणामुळे अचानक एक्झिट, आता उमाईच्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री अभिनेत्याच्या या सुंदर पोस्टवर लेकीनेही प्रतिक्रिया दिली आहे. त्रिशालाने संजय दत्तची ही पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिलं आहे की, "पप्पा खूप सारं प्रेम" Trishala Dutt Post हेही वाचा – Bigg Boss Marathi : “मी तर अनाथ मुलगीच बायको करणार”, घरच्यांच्या आठवणीत सुरज चव्हाणने केलं वक्तव्य त्रिशाला संजय दत्तच्या पहिल्या पत्नीची आहे मुलगी दरम्यान, त्रिशाला दत्त ही संजय दत्त ( Sanjay Dutt ) आणि पहिली पत्नी ऋचा शर्माची मुलगी आहे. १९८६ साली संजय दत्त आणि ऋचा शर्मा यांचं लग्न झालं होतं. लग्नाच्या दोन वर्षानंतंर ऋचाला ब्रेन ट्यूमर झाल्याचं समोर आलं. त्यानंतर १९९६ साली संजय दत्तच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं.