२०२४ मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेमे आले. त्यात बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेमांनी चांगली कमाई केली. काही दाक्षिणात्य सिनेमांनी हिंदीतही चांगली कमाई केली आहे. मात्र, असे असले तरीही बॉलीवूड व दाक्षिणात्य सिनेमा या दोघांतील वाद सोशल मीडियावर नेहमी पाहायला मिळतो. नेटिझन्सही अनेकदा या गोष्टींवरून वाद करीत पोस्ट करीत असतात. असाच वाद एका मुलाखतीत आता बॉलीवूड आणि दाक्षिणात्य निर्मात्यांमध्ये उफाळून आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘गलट्टा प्लस’ च्या राउंड टेबल चर्चेत दाक्षिणात्य विरुद्ध बॉलीवूड असा वाद उफाळून आला. या चर्चेत तेलुगू निर्माते नागा वामसी यांनी बॉलीवूड निर्मात्यांना चित्रपट तयार करताना ‘बांद्रा आणि जुहूच्या बाहेर’ विचार करायला सांगितले आणि असेही नमूद केले, “हिंदी सिनेनिर्माते ज्या पद्धतीने सिनेमाकडे बघायचे, तो दृष्टिकोन दाक्षिणात्य सिनेमाने बदलला आहे.” यामध्ये दाक्षिणात्य निर्माते नागा वामसी यांनी बोनी कपूर यांच्याशी या विषयावर चर्चा करताना वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर आता टीका होत आहे. त्यांची ही टिप्पणी, तसेच वामसी यांनी ज्येष्ठ निर्माते बोनी कपूर बोलत असताना त्यांना थांबवून त्यांच्यासमोर केलेले हे वक्तव्य आणि बोलतानाची त्यांची देहबोली अनेकांना खटकली. त्यात ‘काँटे’ चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांचा समावेश होता.

हेही वाचा…“माझ्या सुरक्षारक्षकांनी त्यांना मारलं”, मिका सिंगच्या ‘त्या’ दाव्यांवर केआरकेचे उत्तर; कपिल शर्माबद्दल म्हणाला…

संजय गुप्तांची टीका

संजय गुप्तांनी नागा वामसींवर सोशल मीडियावर सडकून टीका केली. त्यांनी लिहिले, “हा माणूस कोण आहे? ज्येष्ठ निर्माते बोनीजींसारख्या व्यक्तीसमोर अशा अहंकाराने बोलत आहे. त्याची बोलीभाषा आणि बेजबाबदार वर्तनाकडे पाहा. ४/५ हिट दिल्याने हे लोक बॉलीवूडचे बाप होणार नाहीत.”

ते पुढे म्हणाले, “जरा विचार करा, जर तो ज्येष्ठ तेलुगू निर्माते अल्लू अरविंद सर किंवा सुरेश बाबू सर यांच्या समोर असता, तर त्यांच्याशी अशी बोलण्याची त्याची हिंमत झाली असती का? यश मिळवण्याआधी इतरांचा आदर करायला शिका.”

दाक्षिणात्य निर्माता नागा वामसीने बॉलीवूड निर्मात्यांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी त्याच्यावर टीका केली आहे. (Photo – Sanjay Gupta X Social Media)

हेही वाचा…Video : आशा भोसले यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी ‘तौबा तौबा’ गाणे गात धरला ठेका, केली विकी कौशलची प्रसिद्ध हूकस्टेप

दक्षिणेच्या निर्मात्यांचे कौतुक

संजय गुप्तांनी दक्षिणेतल्या निर्मात्यांमधील नम्रता आणि शिस्त यांचे कौतुक केले. ते म्हणाले, “दक्षिणेतील निर्मात्यांकडून आम्ही पहिल्यांदा नम्रता आणि शिस्त शिकलो. तिथे अहंकार असणारे लोक खूप कमी आहेत.”

हिंदी चित्रपटसृष्टीवर टीका

नागा वामसी यांनी चर्चेदरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीने अलीकडच्या काळात फारशी उल्लेखनीय कामगिरी केली नसल्याचे म्हटले. त्याचप्रमाणे हिंदीतील यशस्वी चित्रपटांमध्ये दक्षिणेकडच्या चित्रपटांचे योगदान असल्याचे सांगितले. या चर्चेदरम्यान बोनी कपूर यांनी हिंदी चित्रपटांचा इतिहास आणि यशस्वी वाटचाल यांवर भर दिला; परंतु वामसी यांनी परिस्थिती बदलत असल्याचे ठासून सांगितले.

हेही वाचा…श्रद्धा कपूरचा ‘स्त्री २’ ते माधुरी दीक्षितचा ‘भूल भुलैया ३’; जाणून घ्या २०२४ मधील हिंदी टॉप ५ चित्रपटांची यादी

‘पुष्पा २’ च्या यशाची तुलना

वामसी यांनी ‘पुष्पा २’च्या यशाचा दाखला देऊन सांगितले, “ ‘पुष्पा-२’ची पहिल्या रविवारीच ८० कोटींची कमाई झाल्यानंतर हिंदी निर्मात्यांना झोप लागत नसेल.” त्यावर संजय गुप्तांनी ट्विटरवर उत्तर दिले, “आम्ही खूप शांतपणे झोपलो होतो. कारण- त्या ८६ कोटींचा फायदा आमच्या वितरकांना झाला. तुम्हाला कदाचित इतरांच्या यशामुळे झोप लागत नसेल; पण आम्हाला नेहमी इतरांचं यश बघून आनंदच होतो.”

हेही वाचा…अभिनेते नासर यांनी मुलाची स्मृती पुन्हा यावी यासाठी दाखवले ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारचे सिनेमे, मुलाच्या अपघाताचा प्रसंग सांगत, म्हणाले…

सोशल मीडियावर चर्चा

नेटिझन्सनीही यावर आपापली मते व्यक्त केली आहेत. काही जण त्यांच्या आवडत्या सिनेसृष्टीच्या बाजूने उभे आहेत; तर काही ‘भारतीय सिनेमा’ म्हणून एकतेचा पुरस्कार करीत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay gupta slams naga vamsi controversial remarks on bollywood and disrespecting boney kapoor psg