Sanjay Kapoor mother Rani Kapoor on Priya Sachdev: उद्योजक संजय कपूर यांचे १२ जून २०२५ ला निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्याच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीवरून मोठा वाद सुरू आहे. संजय कपूर हा करिश्मा कपूरचा एक्स पती होता. त्याच्या मृत्यूनंतर करिश्मा कपूरच्या मुलांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याचेदेखील पाहायला मिळाले.
अशातच संजय कपूरची आई राणी कपूर यांनी संजयची पत्नी प्रिया सचदेववर काही आरोप केले आहेत. सुनावणीदरम्यान त्या खुलासा करत म्हणाल्या की, प्रिया आणि संजयच्या वैवाहिक जीवनात २०२३ पासूनच कलह सुरू झाला होता.
राणी कपूर प्रिया सचदेवबद्दल नेमकं काय म्हणाल्या?
त्यांच्यात सतत भांडणे होत असत. तसेच प्रिया सचदेववर आरोप करत त्या म्हणाल्या की, पतीच्या मृत्यूचे तिला दु:ख झाले नाही, त्याऐवजी पतीची संपत्ती मिळवण्यासाठी ती अनेक प्रयत्न करत आहे.
राणी यांनी असा खुलासादेखील केला की, त्यांना संजयच्या मृत्यूपत्राबद्दल काहीच माहिती नव्हती. तसेच मृत्यूपत्रात त्यांचा कुठेही उल्लेख नाही. संजय असे म्हणत असे, त्याला जे काही मिळालं आहे ते माझ्यामुळे, त्याच्या आईमुळे मिळालं आहे.
राणी यांचे वकील असेही म्हणाले की, संजय यांनी कमीत कमी त्यांच्या मृत्यूपत्रात असे लिहिले असते की आई राणी यांना माझ्या संपत्तीमधील काहीच देऊ इच्छित नाही.
संजय कपूर यांच्या आईकडून केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, संजयने एकट्या प्रियाला संपत्तीचा वारसदार बनवले यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. संजयचे त्याच्या सगळ्या मुलांबरोबर, कपूर परिवाराबरोबर तसेच आईबरोबर चांगले नाते होते.
दरम्यान, संजय कपूरचा इंग्लंडमध्ये पोलो मॅच खेळताना मृत्यू झाला. ऑटो कंपोनंट बनवणाऱ्या सोना कॉमस्टारचे ते चेअरमन होते. ही कंपनी त्यांचे दिवंगत वडील सुरिंदर कपूर यांनी १९९७ मध्ये स्थापन केली होती. करिश्मा आणि संजय कपूर यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांचे २००३ मध्ये लग्न झाले होते. मात्र, त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. २०१६ ला त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना दोन मुले आहेत.
