Sara Ali Khan Birthday Special: बॉलीवूडची चुलबुली अभिनेत्री सारा अली खान आज तिचा ३१ वा वाढदिवस साजरा करीत आहे. आपल्या अदा आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या साराचा चाहतावर्ग मोठा आहे. तिने २०१८ मध्ये ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण केले. सुशांत सिंह राजपूत आणि सारा यांच्यातील केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. सारा आणि सुशांत यांची जोडी चाहत्यांना आवडू लागली होती. पण, त्याचबरोबर खऱ्या आयु्ष्यामध्येही त्यांच्यात प्रेमाचे नाते फुलले होते, अशी चर्चा रंगली होती. सुशांत आणि सारा यांच्या नात्यावर अभिनेत्रीची आई अमृता सिंहने नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे.

अभिनेता सैफ अली खान व अमृता सिंह यांची मुलगी असलेल्या साराने तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बॉलीवूडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत असताना तिला बॉलीवूड खुणावत असल्याचा खुलासा तिने स्वतः केला होता. त्यानंतर वाढलेल्या वजनावर नियंत्रण मिळवीत सारा अली खानने बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण केले. ‘केदारनाथ’ या पहिल्याच चित्रपटातील तिचा अभिनय आणि सुशांतबरोबर जमलेली त्यांची जोडी यांमुळे प्रेक्षकांचे तिच्याकडे लक्ष वेधले गेले होते. अनेकदा ते एकत्र दिसून येत होते. त्यावेळी सारा अली खान व सुशांत सिंह राजपूत यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना उधाण आले होते.

अमृता सिंह यांना आवडत नव्हता सुशांत सिंह राजपूत

सारा खानच्या पदार्पणातील पहिल्याच चित्रपटानंतर तिच्या आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या अफेअरच्या अफवा पसरू लागल्या. ‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार, सारा आणि सुशांत एकमेकांना डेट करीत होते. ते अनेकदा एकत्र फिरताना दिसून आले होते. दरम्यान, साराबद्दलची ही अफवा तिची आई अमृता सिंहपर्यंत पोहोचली. सारा अली खानच्या आईला दोघांच्या नात्यांबद्दल सुरू असलेल्या चर्चा अजिबात आवडल्या नव्हत्या.

अमृता सिंह यांनी सुशांतला दिलेली वॉर्निंग

मीडिया रिपोर्टनुसार सारा अली खानने सुशांतसाठी तिच्या आईचे घरसुद्धा सोडले होतो. त्यावेळी सारा ही एका नवीन फ्लॅटमध्ये राहायला गेल्याचेदेखील बोलले जाते. सारा अली खान व सुशांत सिंह राजपूत यांच्यातील नात्यांबाबत पसरलेल्या अफवांमुळे अमृता सिंह अजिबात खूश नव्हत्या. त्या मुद्द्यावरून सिनेमाच्या शूटिंग प्रसंगी अमृता आणि सुशांत यांच्यात वादही झाला असल्याचे म्हटले जात होते. इतकेच नाही, तर अमृता यांनी सुशांतला सारा अली खानपासून दूर राहण्याचा सल्ला देत, ‘ओव्हरस्मार्ट’ होऊ नको,’ अशी ताकीद दिल्याचीही चर्चा होती. त्यानंतर अमृता यांनी सारालाही सुनावल्याचे बोलले जाते. या सगळ्या प्रकारानंतर साराने सुशांतपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली.

सारा अली खानने दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या ‘केदारनाथ’ सिनेमामध्ये मुक्कू म्हणजेच मंदाकिनी मिश्रा ही भूमिका साकारली होती. मन्सूरबरोबर तिची जुळून येणारी मैत्री आणि प्रेम यांवर आधारित केदारनाथ या सिनेमाची गोष्ट होती. त्यामध्ये हे पात्र सुशांत सिंह राजपूतने साकारले होते. सिनेमातील अभिनयाच्या जोरावर साराने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत, अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ती रणवीर सिंहबरोबर ‘सिंबा’ या सिनेमामध्ये झळकली होती; पण सारा अली खान व सुशांत सिंह राजपूत यांची जोडीच चर्चेमध्ये आली होती.

सारा अली खान व कार्तिक आर्यनच्या रिलेशनशिपची रंगलेली चर्चा

दरम्यान, सारा अली खानचे बॉलीवूडमधील करिअर नेहमीच चर्चेमध्ये राहिले आहे. कुली नंबर १’, ‘अतरंगी रे’, ‘गॅसलाइट’, ‘जरा हटके जरा बचके’, ‘‘मेट्रो… इन दिनों’ या सिनेमांमध्ये झळकली होती. यानंतर ‘लव्ह आज कल’ सिनेमामध्ये कार्तिक आर्यनबरोबर स्क्रीन शेअर केली होती. यावेळी सारा आणि कार्तिक आर्यनच्या नात्याचीही जोरदार चर्चा रंगली होती. करण जौहरच्या शोमध्ये साराने थेट कार्तिक आर्यनचे नाव घेत त्याला डेट करायची इच्छा व्यक्त केली होती.