अभिनेत्री सारा अली खान ही बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून सारा क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघांना अनेक ठिकाणी एकत्रही बघण्यात आलं होतं. आता साराने नुकतचं एका मुलाखतीत तिला कशा प्रकारच्या व्यक्तीशी लग्न करायचं आहे याबाबत खुलासा केला आहे.




सारा अली खानची आजी शर्मिला टागोर यांनी क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडींबरोबर लग्न केलं. आता साराही तिच्या आजीच्या पावलावर पाऊल ठेवून क्रिकेटरशी लग्न करणार का? असा प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देत साराने तिला नेमका कसा मुलगा हवा आहे याबाबत सांगितलं आहे.
सारा म्हणाली, “ती व्यक्ती क्रिकेटर किंवा उद्योगपती असू शकते, पण मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या त्याचे विचार माझ्याशी जुळले पाहिजे. माझा जोडीदार होण्यासाठी तो क्रिकेटर, व्यावसायिक, डॉक्टर असणे आवश्यक आहे असं मला वाटतं नाही. पण आमच्या दोघांचे विचार आणि मन जुळणं फार महत्वाचं आहे.”
हेही वाचा- Adipurush Trailer: जबरदस्त! चाहत्यांना भावला रावणाच्या भूमिकेतील सैफ अली खान, कौतुक करत म्हणाले…
सध्या भारतीय संघातील कोणाला डेट करत आहे का? असा प्रश्नही साराला विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देत सारा म्हणाली, “अद्याप मी अशा व्यक्तीला भेटले नाही ज्याबरोबर मी सेटल होऊ शकेन. मला असा जोडीदार भेटला नाही. ” असे सारा म्हणाली.
साराच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तिचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात सारा अली खानबरोबर विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत या चित्रपटाने ३० कोटींची कमाई केली आहे.