scorecardresearch

…म्हणून सारा अली खानने लपवला चेहरा, खरं कारण आलं समोर

नुकताच तिने जिममधून बाहेर येताना तिचा चेहरा लपवला.

…म्हणून सारा अली खानने लपवला चेहरा, खरं कारण आलं समोर

सारा अली खान ही आजच्या तरुण पिढीतली आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्या कामांमुळे तर ती नेहमी चर्चेत असतेच पण त्याचबरोबर तिच्या फिटनेसच्या आवडीमुळेही सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असते. व्यायाम करणं ती कधीही चुकवत नाही. वर्कआउट केल्यानंतर अनेकदा ते जिमच्या बाहेरही दिसते. दरवेळी ती आनंदाने व मीडिया फोटोग्राफर्सना स्वतःचे फोटो काढू देते. पण नुकताच तिने जिममधून बाहेर येताना तिचा चेहरा लपवला. तो तिचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. तिने नेमका कोणत्या कारणासाठी तिचा चेहरा लपवला हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता होती. आता तिच्या या कृतीमागील कारण स्पष्ट झालं आहे.

साराने तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर तिच्या मॉर्निंग लूकची एक झलक दाखवली. ती झलक दाखवत असताना ती तिचा चेहरा का लपवत होती हे सर्वांना दाखवलं. सारा अली खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिचा एक बूमरँग व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती तिच्या गाडीत बसलेली दिसत आहे. तिचे केस मोकळे सोडून एक गाडीत बसून तिच्या चेहऱ्यावर बर्फाचा क्यूब चोळताना दिसत आहे.

आणखी वाचा : “माझ्या आयुष्यातील…”; हृतिक रोशनच्या बहिणीबरोबरबरोबर रंगत असलेल्या अफेअरच्या चर्चांवर कार्तिक आर्यनने सोडलं मौन

हा व्हिडीओ पोस्ट करताना साराने एक इंस्टाग्राम फिल्टरही वापरला आहे. या फिल्टरमुळे तिचा चेहरा आणखीनच गुलाबी झाला आहे आणि तिच्या डोळ्यांचा रंगही बदलला आहे. हा फोटो शेअर करत साराने लिहिले, “अर्ली मॉर्निंग फेशियल!” तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना समजलं की ती तिचा चेहरा फोटोग्राफर्सपासून का लपवत होती.

हेही वाचा : चाहत्याला फोटो देत असताना सारा अली खानच्या डोळ्यात आले अश्रू, व्हिडीओ व्हायरल

साराने काही दिवसांपूर्वी तिच्या आगामी ‘ए वतन मेरे वतन’ या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात ती एका स्वातंत्र्य सैनिकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार आहे. तर यासोबतच सारा लक्ष्मण उतेकरच्या एका आगामी चित्रपटात विकी कौशल सोबत दिसणार आहे. तसंच विक्रांत मॅसी आणि चित्रांगदा सिंगसोबत सारा ‘गॅसलाइट’ या चित्रपटाचाही भाग असणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 14:23 IST

संबंधित बातम्या