scorecardresearch

अबब! सारा अली खानला आल्या दाढी-मिशा, स्वतःच फोटो शेअर करत म्हणाली…

तिचा हा फोटो सध्या फारच व्हायरल होत आहे.

saraa ali khan

अभिनेत्री सारा अली खान ही तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चांगलीच चर्चेत असते. तिचा बिनधास्त आणि दिलखुलास अंदाज सर्वांनाच भावतो. सोशल मिडियावर सक्रिय राहून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. पण आता तिचा एक वेगळाच फोटो खूप चर्चेत आला आहे.

सारा अली खान सोशल मिडियावर नेहमीच तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. ती तिच्या ग्लॅमरस फोटोंबरोबरच अनेक मजेशीर व्हिडीओही पोस्ट करत असते. आता असाच स्वतःचा एडिट केलेला एक गमतीशीर फोटो तिने न लाजता सोशल मिडियावर शेअर केला आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये तिला दाढी, मिशा आलेल्या दिसत आहेत.

हेही वाचा : Video: …अन् सारा अली खान रितेश देशमुखशी चक्क मराठीत बोलू लागली, व्हिडीओ व्हायरल

या फोटोमध्ये सारा स्विमिंग पूलमध्ये बसलेली दिसत असून तिला दाढी, मिशा आलेल्या दिसत आहेत. हा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत दिग्दर्शक होमी अदजानियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोटो स्टोरीत शेअर करत तिने लिहिलं “फोटोग्राफर कुठे आहे शोधा. माझ्यातील स्त्रीची सुंदर बाजू नेहमी समोर आणल्याबद्दल होमी अदजानियांचे आभार. तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा.”

आणखी वाचा : सारा अली खानने केला मुंबई लोकलमधून प्रवास, तिला बघताच सहप्रवाशांनी केलं असं काही की…

तिचा हा फोटो सध्या सोशल मिडियावर खूप व्हायरल झाला आहे. सर्वच नेटकरी या फोटोवर विविध प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी ती तंतोतंत मुलगा वाटत आहे असं म्हंटलं, तर काहींनी तिला चित्रपटांमध्ये अभिनेत्याचीही भूमिका करण्याचा सल्ला दिला आहे .

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 15:22 IST
ताज्या बातम्या