सारा अली खानने केला मुंबई लोकलमधून प्रवास, तिला बघताच सहप्रवाशांनी केलं असं काही की... | Sara ali khan travelled by train and auto in mumbai | Loksatta

सारा अली खानने केला मुंबई लोकलमधून प्रवास, तिला बघताच सहप्रवाशांनी केलं असं काही की…

तिने शेअर केलेला व्हिडीओ पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सारा अली खानने केला मुंबई लोकलमधून प्रवास, तिला बघताच सहप्रवाशांनी केलं असं काही की…

मुंबई आणि लोकलचं अतूट नातं आहे. प्रत्येकालाच मुंबई लोकलचं आकर्षण असतं. बॉलिवूड कलाकारही याला अपवाद नाहीत. दरवेळी आलिशान गाड्यांमधून फिरणारे कलाकार कधीतरी अचानक रेल्वे प्लॅटफॉर्मवर किंवा ट्रेनमध्ये दिसतात. अशातच एका आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रीने रेल्वे प्रवासाचा आनंद उपभोगला आहे. ही अभिनेत्री म्हणजे सारा अली खान.

सारा अली खान ही तिच्या दिलखुलास स्वभावाने सर्वांचं लक्ष वेधत असते. आता नुकताच तिने मुंबईच्या लोकलचा प्रवास केला आहे. तिने लोकल प्रवास केल्याचं समजताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आणखी वाचा : ठरलं! ‘या’ ठिकाणी संपन्न होणार सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी यांचा विवाह सोहळा

साराने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत ती लोकलमधून प्रवास करताना दिसत आहे. तिच्यासोबत तिचे काही मित्र आणि मैत्रीणदेखील आहेत. या व्हिडीओत सारा म्हणते, ‘नमस्कार प्रेक्षकांनो, आम्ही मुंबईच्या ट्राफिकपासून वाचण्यासाठी ट्रेनने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. कारण मेहनत नाही तर फळंही नाही. ट्रेनमधून उतरल्यावर आम्ही रिक्षाने पुढे जाणार आहोत.” त्यानंतर ती पुन्हा रिक्षात दिसते आणि इच्छित स्थळी पोहोचल्याचं सांगते.

हेही वाचा : …म्हणून सारा अली खानने लपवला चेहरा, खरं कारण आलं समोर

ट्रेनमध्ये भरपूर गर्दी असून इतर प्रवासी नेहमीसारखे प्रवास करत आहेत. प्रत्येकजण आपापल्या नादात आहे. गंमत म्हणजे या साराच्या या संपूर्ण प्रवासात तिला कोणीही ओळखलं नाही. आपल्याच डब्यात सारा अली खान आहे याचा अंदाज कोणालाही आला नाही. साराने तिला पोहोचायच्या ठिकाणी ती पोहोचल्यावर हा तिच्या लोकल प्रवासाचा व्हिडीओ पोस्ट केला. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाचा चर्चेचा विषय ठरतोय. साराच्या साधेपणाचं सर्वजण कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 10:14 IST
Next Story
‘सिर्फ तुम’ चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्रिया गिल सध्या काय करते? जाणून घ्या कुठे आहे अभिनेत्री