scorecardresearch

“देव चांगल्या माणसांना लवकर घेऊन जातो” सतीश कौशिक यांच्या निधनानंतर कुटुंबीय भावूक

Sathish Kaushik Died : सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

satish kaushik passed away (2)
सतीश कौशिक यांचं निधन. (फोटो: एएनआय)

Satish Kaushik Passed Away: बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. कौशिक यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांची भाची अनिता शर्मा यांनी एएनआयशी संवाद साधला. त्या भावूक होत म्हणाल्या, “सतीशला पुन्हा आपल्यात आणू शकले असते तर…तो भावडांमध्ये लहान होता. त्याला मोठा भाऊ आणि बहीण आहे. आता ते पुढचं आयुष्य कसं जगतील? त्याने लोकांच्या मनात त्याचं स्थान निर्माण केलं होतं. देव चांगल्या माणसांना लवकर घेऊन जातो”.

हेही वाचा>> “झोपायला गेल्यानंतर रात्री १० वाजता…” सतीश कौशिक यांच्या निधनानंतर मॅनेजरचा खुलासा

हेही पाहा>> Satish Kaushik Passed Away: पत्नी आणि १० वर्षांच्या मुलीसाठी किती संपत्ती सोडून गेले सतीश कौशिक?

सतीश कौशिक यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालातही हृदयविकाराचा झटक्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचं नमूद केलं आहे. कौशिक यांच्या मृतदेहावर कोणत्याही खुणा आढळलेल्या नाहीत. सतीश कौशिक यांच्या मृतदेहावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी याबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा>>Video: ६६व्या वर्षीही नियमित व्यायाम करायचे सतीश कौशिक, निधनानंतर जीममधील व्हिडीओ व्हायरल

सतीश कौशिक यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुंबईतील वर्सोवा येथील त्यांच्या निवासस्थानी कौशिक यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. वर्सोवा येथीलच हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. सतीश कौशिक यांच्यामागे त्यांची पत्नी व १० वर्षांची मुलगी असा परिवार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 16:47 IST
ताज्या बातम्या