scorecardresearch

…अन् सतीश कौशिक यांची ‘ती’ इच्छा अपूर्णच राहिली; पुतण्याचा खुलासा, म्हणाला….

सतीश कौशीक यांची होती ‘ही’ इच्छा, पुतण्या निशांतने केला खुलासा

satish kaushik satish kaushik death
सतीश कौशीक यांची होती 'ही' इच्छा, पुतण्या निशांतने केला खुलासा

सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सतीश यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय कोलमडून गेले आहेत. दरम्यान सतीश यांच्या मृत्यू प्रकरणी विविध चर्चा सुरू आहेत. सतीश यांनी निधनापूर्वी व्यावसायिक विकास मालू यांच्या फार्महाऊसवर होळी पार्टी केली होती. सतीश यांची हत्या विकासने केली असल्याचं व्यासायिकाची पत्नी सान्वी मालू म्हणत आहे.

आणखी वाचा – “रशियन मुलींचा वापर करुन…” सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात व्यावसायिकाच्या पत्नीचे पुन्हा एकदा गंभीर आरोप

दरम्यान या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचं शशी कौशिक यांनी म्हटलं आहे. पण सध्या त्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती नेमकी कशी आहे? सतीश यांची शेवटची इच्छा काय होती? ते कोणत्या चित्रपटावर सध्या काम करत होते याबाबत नवी माहिती समोर आली आहे. ‘ईटाइम्स’ला सतीश यांचा पुतण्या निशांतने मुलाखत दिली.

यावेळी निशांत म्हणाला, “परिस्थितीशी जुळवून घेण्याचा सगळेच जण प्रयत्न करत आहेत. पण कुटुंबियांची अवस्था सध्या वाईट आहे. शशी काकी (सतीश कौशिक यांच्या पत्नी) या शांत असतात आणि जुन्या आवठवणींमध्ये रमतात. वंशिका (सतीश कौशिक यांची मुलगी) पाहुण्यांसमोर बोलत नाही. पण ज्याक्षणी ती एकटी असते तेव्हा तिला अस्वस्थ वाटतं. या कुटुंबाचं आयुष्यच थांबलं आहे”.

आणखी वाचा – आईच्या निधनानंतर माधुरी दीक्षितची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली, “आज सकाळी उठले आणि…”

“मीच सतीश यांना अग्नी दिला. मी त्यांच्याबरोबर कामही केलं आहे. सतीश कौशिक एंटरटेनमेंटमधील मी एक निर्माता होतो.” तसेच सतीश यांची कोणती इच्छा होती याबाबतही निशांतने सांगितलं. तो म्हणाला, “सतीश यांना त्यांचं प्रॉडक्शन हाऊस चांगल्या पातळीवर घेऊन जायचं होतं. आपला एक मोठा स्टुडिओ असावा अशी त्यांची इच्छा होती”. हरिद्वारमध्ये सतीश यांच्या अस्थीचं विसर्जन करण्यात आलं असल्याचंही निशांतने सांगितलं. शिवाय सतीश ‘कागज २’ चित्रपटावर काम करत होते. आता या चित्रपटाचं पुढचं काम निशांत बघणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 19:45 IST
ताज्या बातम्या