आपल्या लाडक्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते त्यांच्या घराबाहेर चातकासारखी वाट बघत असतात. बॉलिवूडचा शाहरुख खान याचे चाहते देशभरात आहेत. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी ते मन्नतबाहेर वाट बघत असतात. अमिताभ बच्चन यांचे चाहतेदेखील अगदी पूर्वीपासून त्यांच्या घराबाहेर त्यांची प्रतीक्षा करत असतात. नुकताच अहमदाबाद शहरात कार्तिक आर्यनला भेटण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

‘भूलभुलैया २’च्या यशानंतर कार्तिक सध्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर कियारा अडवाणीदेखील आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणा करिता कार्तिक अहमदाबाद शहरात गेला असताना त्याला पाहण्यासाठी तरुणाईने गर्दी केली होती. चाहत्यांच्या गराड्यात कार्तिक अडकला होता. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. कार्तिक कियाराचा हा चित्रपट एक संगीतमय प्रेमकथा असणार आहे.

क्रितीच्या बरोबरीने बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री लावणार ठुमके; ‘भेडिया’ चित्रपटातील गाणे प्रदर्शित

मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. याआधी समीरने नाटक, चित्रपट, वेबसीरिज या माध्यमांमध्ये काम केले आहे. तो हिंदीत पहिल्यांदाच झळकत आहे. सुप्रसिद्ध निर्माते साजिद नाडियाडवाला, आणि शरीन मंत्री केडिया हे ‘नमाह पिक्चर्स’च्या सहाय्याने या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

कार्तिक आर्यनकडे ‘शहजादा’, ‘फ्रेडी’ हे चित्रपटदेखील आहेत. याशिवाय कबीर खानचा ‘स्ट्रीट फायटर’ आणि हंसल मेहता यांच्या ‘कॅप्टन इंडिया’मध्येही तो दिसणार आहे. भाऊबिजेच्या निमित्ताने त्याने आपल्या बहिणी बरोबरच फोटो शेअर केला होता. नेटकऱ्यांनी त्याच्या या कृतीचे कौतूक केले होते.