scorecardresearch

Video : पार्टीमधून बाहेर पडताच सोहेल खानच्या पूर्वाश्रमीच्या बायकोला धड चालताही येईना, मलायका म्हणते, “महिलांना दारू पिण्याची…”

‘मूविंग इन विथ मलायका’ शोमध्ये सीमा सजदेहचा ‘त्या’ व्हायरल व्हिडीओबाबत खुलासा, मलायका अरोरानेही दिली पाठिंबा.

Video : पार्टीमधून बाहेर पडताच सोहेल खानच्या पूर्वाश्रमीच्या बायकोला धड चालताही येईना, मलायका म्हणते, “महिलांना दारू पिण्याची…”
'मूविंग इन विथ मलायका' शोमध्ये सीमा सजदेहचा 'त्या' व्हायरल व्हिडीओबाबत खुलासा, मलायका अरोरानेही दिली पाठिंबा.

बॉलिवूडमधील पार्ट्यांची बी-टाऊनमध्ये नेहमीच चर्चा रंगताना दिसते. कलाकार मंडळी या पार्ट्यांना कोणत्या रंगाचे कपडे परिधान करतात? कोणत्या गाडीमधून येतात? याबाबत जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना अधिक रस असतो. काही दिवसांपूर्वीच करण जोहरने एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीसाठी स्टारकिड्ससह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यादरम्यानचा सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी सीमा सजदेहचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

आणखी वाचा – रणवीर सिंगला कॉपी करतो का? सिद्धार्थ जाधव स्पष्टच म्हणाला, “हो मी… “

सीमा खान या पार्टीमधून जेव्हा बाहेर पडली तेव्हा तिची अवस्था पाहून सारेच जण थक्क झाले. सीमाला नीट चालताही येत नव्हतं. ती भिंतीचा आधार घेत चालताना दिसली. पापाराझी छायाचित्रकारांनी तिला पोझ देण्यासाठी सांगितलं तेव्हाही तिला नीट उभं राहता येत नव्हतं. दारू इतकी प्यायली आहे की धड चालता ही येत नाही अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या होत्या.

यावर आता सीमाने भाष्य केलं आहे. ‘मूविंग इन विथ मलायका’ या शोमध्ये सीमाने हजेरी लावली होती. या व्हिडीओबाबत मलायकाने सीमाला प्रश्न विचारला. यावर उत्तर देत ती म्हणाली, “माझा व्हिडीओ पाहिल्यानंतर मुलगा निर्वानने मला कॉल केला. त्याने या व्हिडीओवर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. तो कोणता ड्रेस होता? एवढंच त्याने मला विचारलं. पण हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुढचे दोन दिवस नरकात असल्यासारखं मला वाटलं. मी जे केलं आहे ते मी टाळत नाही. पण असं प्रत्येकजण करतो. मी एकटीच अशी वेडी नाही की त्यावेळी असं चालत होती.”

सीमाच्या या उत्तरानंतर मलायका तिला पाठिंबा देत म्हणते, “तू चांगला वेळ घालवलास. पण त्या नजरेने लोक याकडे पाहत नाहीत. असं का? महिलांना बाहेर पडून दारू पिण्याची परवानगी नाही का? स्वतःचा वेळ एण्जॉय करण्याची परवानगी नाही? व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तुला बोललं गेलं की हिचं कोणतंच चारित्र्य नाही. पण आपल्यालाच प्रत्येक गोष्टीमध्ये का जज केलं जातं?” एकूणच काय तर महिलांनी घराबाहेर पडून दारू पिण्यात काहीच गैर नसल्याचं मलायकाचं म्हणणं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 11:02 IST

संबंधित बातम्या