Seema Sajdeh Sohail Khan Divorce : सोहेल खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर सीमा सजदेह तिचा धाकटा मुलगा योहानला घेऊन वरळीला राहायला गेली. तिचं वांद्रेमध्ये सोहेल खानच्या घराजवळ होतं, मात्र तिने तिथे न राहता वरळीला जायचं ठरवलं. तिचा हा निर्णय तिची जवळची मैत्रीण महीप कपूरला आवडला नाही. आता ‘फॅब्युलस लाइव्ह ऑफ बॉलीवूड वाइव्ह्ज’मध्ये सीमाने तिच्या या निर्णयाबद्दल खेद व्यक्त केला. तसेच योहान तिच्याबरोबर नाही तर वांद्रेमध्ये वडील सोहेलबरोबर जास्त राहतो असंही तिने सांगितलं.

शोमध्ये महीप कपूरने नीलम कोठारीकडे तक्रार केली की सीमाने वांद्रे सोडण्याचा निर्णय घेतला. महीप म्हणाली, “ती वांद्र्यातून शिफ्ट झाली, मी तिला नको म्हटलं होतं. ‘तुझे मित्र इथे आहेत, तुझं काम इथे आहे, निर्वाण अमेरिकेतून परत आला आहे, तोही इथे राहतो, तुझी मुलं इथं आहेत,’ असं मी तिला म्हणाले. तिने वांद्रेपासून इतक्या दूर जाण्याची गरज नव्हती.”

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Arjun Kapoor Confirms Breakup With Malaika Arora
Video: ६ वर्षांचं नातं संपलं, मलायकाचं नाव ऐकू येताच राज ठाकरेंच्या शेजारी उभा असलेला अर्जुन कपूर म्हणाला…
siddharth chandekar family visited star pravah mi honar superstar show
सिद्धार्थ चांदेकरला मिळालं गोड Surprise! शोमध्ये आई अन् पत्नीची उपस्थिती; त्याचे सावत्र वडील म्हणाले, “आम्ही सगळे…”
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
what prithvik pratap wife prajakta vaikul do
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”
Deepika Padukone Ranveer Singh Reveals Baby Girl Name
दीपिका पादुकोण-रणवीर सिंह यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ठेवलं लाडक्या लेकीचं नाव; फोटो शेअर करत सांगितला अर्थ

Video: डिंपल कपाडियांचा लेकीबरोबर फोटो काढण्यास नकार; ट्विंकल खन्नाचा ‘ज्युनिअर’ असा उल्लेख करत म्हणाल्या…

या सीरिजच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये सीमाचा मोठा मुलगा निर्वाणने आईच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिलं. “वांद्र्यात बाबाच्या घरापासून तुझं घर जवळ होतं, रस्ता ओलांडला की तिथे सहज यायला जमायचं. आम्ही तुला रोज भेटू शकत होतो,” असं निर्वाण म्हणाला. त्यावर सीमाने त्याला उत्तर दिलं.

“मला वाटलं की या इमारतीत आधीपेक्षा जास्त लोक आहेत, लहान मुलं आहेत, त्यामुळे योहानसाठी बरं राहील. योहानकडे तिथे करण्यासारखं खूप नव्हतं, त्या तुलनेत इथे त्याच्यासाठी बऱ्याच अॅक्टिव्हिटी आहेत. म्हणून घटस्फोटानंतर मी वरळीला जाण्याचा निर्णय घेतला. योहान आणि माझ्यासाठी ही एक नवीन सुरुवात होती. मला वाटले की ते त्याच्यासाठी चांगले होईल. पण, मी विचार केला होता तसं काहीच घडलं नाही आणि तो जास्त वेळ वांद्र्यात घालवतो,” असं सीमा म्हणाली.

हेही वाचा – अखेर ७ वर्षांनी वाद मिटला! जखमी गोविंदाची भाचा कृष्णा अभिषेकने घेतली भेट; म्हणाला, “मामींना भेटण्याची भीती…”

निर्वाण पुढे म्हणाला, “त्याचे सर्व मित्र वांद्र्यात आहेत. तो वांद्र्यात वाढलाय.” त्यावर सीमा म्हणाली हो त्यामुळे मला सारखं त्याला वांद्र्याला सोडायला जावं लागतं. मग निर्वाण म्हणाला, “आता तू वरळीला गेली आहे, त्यामुळे आमच्यासाठी वांद्र्याहून वरळी करणं कठीण झालं आहे. तुला खूपदा आम्ही भेटत नाही. आम्ही त्या घरात वाढलो. त्या घरात योहानचा जन्म झाला. त्या घरात आठवणी आहेत. त्या घरात आम्हाला कंफर्टेबल वाटतं.” सीमाने त्याला विचारलं, “मग आता काय? मी परत यावं असं तुला वाटतंय का?” त्यावर लगेच निर्वाणने होकार दिला.

हेही वाचा – हृतिक रोशनच्या पहिल्याच चित्रपटाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये का झाली होती? ‘हे’ आहे कारण…

सीमा व सोहेलचा २०२२ मध्ये घटस्फोट झाला. या शोमध्ये तिने बॉयफ्रेंडशी ओळख करून दिली. १९९८ मध्ये सोहेल खानबरोबर पळून जाण्यापूर्वी ज्याच्याशी तिने साखरपुडा मोडला होता, त्याच विक्रम आहुजाला ती आता डेट करत आहे.

Story img Loader