Randhir Kapoor on marriage with Babita: राज कपूर यांचा सर्वात मोठा मुलगा रणधीर कपूर यांना त्यांच्या करिअरमध्ये मोठे चढ-उतार पाहावे लागले. इतकेच नाही तर खासगी आयुष्यातदेखील त्यांना चढ-उतार पाहावे लागले. पत्नी बबिता यांच्याबरोबरचे त्यांचे नाते चर्चेत राहिले. एका जुन्या मुलाखतीत रणधीर कपूर यांनी करिअर आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल वक्तव्य केले होते. ते नेमके काय म्हणाले होते, हे जाणून घेऊ…
“करिश्मा आणि करीना या माझ्या…”
‘यादें बी टाऊन की- इस दुनिया के सितारे’ या शोचे सूत्रसंचालन जावेद जाफरी यांनी केले होते. या शोमध्ये रणधीर कपूर यांनी हजेरी लावली होती. ते म्हणाले होते, “घडलेल्या सगळ्या गोष्टींची पूर्ण जबाबदारी मी घेतो. जे काही झालं ते क्षणिक भावनेतून झालं, आजही बबिता माझी पत्नी आहे आणि कायम राहील. करिश्मा आणि करीना या माझ्या मुली आहेत आणि त्याच माझ्या मुली राहतील. मी माणूस आहे, माणसाकडून चुका होतात आणि मी त्यावर काम करत आहे. आम्ही आजही एकत्र आहोत.”
“आम्ही एकमेकांना…”
पुढे ते म्हणालेले, “मी माझ्या पहिल्या चित्रपटातील हिरोईनशी लग्न केलं. ‘कल, आज और कल’ हा सिनेमा मी दिग्दर्शित केला होता. त्या सिनेमात बबिता होती. आम्ही एकमेकांना आवडलो, त्यानंतर आम्ही लग्न केले. आम्हाला दोन सुंदर मुली झाल्या. माझ्या सर्व चित्रपटातील हिरोईन माझ्याशी मी त्यांचा बॉयफ्रेंड असल्याप्रमाणे बोलत असत, त्यानंतर आम्ही चांगले मित्र होत असू. माझी जी ऑनस्क्रीन इमेज होती, त्यामुळे माझा कोणी गांभीर्याने विचार करत नसे. त्यांच्या दुःखात मी त्यांना आधार देत असे, बबिता त्यांची चांगली मैत्रीण होत असे.”
या शोमध्ये बोलण्याआधीही रणधीर कपूर यांनी विविध मुलाखतींमध्ये त्यांच्या लग्नात आलेल्या अडचणींबद्दल वक्तव्य केले होते. हिंदूस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणालेले, “मी खूप दारू प्यायचो, घरी उशिरा यायचो ती गोष्ट बबिताला आवडली नाही. जरी आमचा प्रेम विवाह असला तरी तिला जसे जगायचे होते, तसेच मला जगायचे नव्हते. मी जसा होतो, तसे ती मला स्वीकारत नव्हती, त्यामुळे आमच्या लग्नात समस्या निर्माण झाल्या. आम्हाला दोन गोड मुली झाल्या. त्यांना तिने उत्तम पद्धतीने वाढवले. त्या दोघींनी त्यांच्या करिअरमध्ये यश मिळवले. एक वडील म्हणून मला आणखी काय हवे असेल?”
जावेद जाफरी यांना दिलेल्या मुलाखतीत रणधीर कपूर यांनी करिअरमध्ये त्यांना जे अपयश आले, त्याबद्दलही वक्तव्य केले होते. ते म्हणालेले की, “मला कोणत्याही गोष्टींची काळजी नव्हती, मी बेजबाबदारपणे वागायचो. कोणत्याही गोष्टीची जबाबदारी घेत नसे, त्यामुळे त्याची जबाबदारी माझी आहे. “
रिपोर्ट्सनुसार, रणधीर कपूर व बबिता यांची १९६९ ला पहिल्यांदा भेट झाली. त्यांनी दोन वर्षे एकमेकांना डेट केले. १९७१ ला त्यांनी लग्न केले. १९७४ ला करिश्माचा जन्म झाला. १९८० ला करीनाचा जन्म झाला. १९८८ ला ते वेगळे झाले. जवळजवळ ३० वर्षे वेगळे राहिल्यानंतर २०२३ मध्ये पुन्हा ते एकत्र आले.
