कलाक्षेत्रामधील काही जोडप्यांकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. त्यातीलच एक जोडपं म्हणजे जावेद अख्तर आणि शबाना आझमी. १९८४मध्ये शबाना व जावेद विवाहबंधनात अडकले. पण जावेद यांचं हे दुसरं लग्न होतं. जावेद विवाहित असतानाच ते शबाना यांच्या प्रेमात पडले. शिवाय पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुलंही होती. हनी यांना घटस्फोट न देताच शबाना यांच्याशी जावेद यांनी दुसरं लग्न केलं. शबाना यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत भाष्य केलं आहे. 'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत शबाना यांनी त्यांच्या खासही आयुष्याबाबत खुलासा केला. त्या म्हणाल्या, "सुरुवातीला मी अजिबात रोमँटिक नव्हते. आताच्या मुलींमध्ये रोमान्सची व्याख्या बदलली असावी. पण माझ्या काळात रोमान्सच्या बाबतीत मुलींचे विचार खूप चांगले होते. पण रोमान्सच्या बाबतीत माझे विचार वेगळे होते. कारण मी माझ्या आई-वडिलांचं वैवाहिक आयुष्य पाहिलं आहे". आणखी वाचा - “बाईला पुरुषी वासनेसाठी नाचावं लागणं…” शाहीर संभाजी भगत यांची गौतमी पाटीलबाबत पोस्ट, म्हणाले, “आडनाव बदलून लाज…” "त्यांच्या नात्याला रोमान्सपासून सुरुवात झाली आणि नंतर ते नातं मैत्रीत बदललं. त्यामुळे मला मैत्रीची अधिक किंमत आहे". जावेद यांच्याबरोबर असलेल्या नात्याबाबत शबाना म्हणाल्या, "आमच्यामध्ये खूप भांडणं होतात. एकमेकांना मारावसं वाटतं. पण दिवसाच्या शेवटी एकमेकांचा आदर करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. शबाना माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आहे असं जावेद यांना बोलायला आवडतं. या मैत्रीमुळेच वैवाहिक आयुष्याचा माझ्यावर कोणताच वाईट परिणाम झाला नाही". आणखी वाचा - “तेव्हा तिला दोन वेळेचं जेवण तुम्ही देत होता का?”, अमोल कोल्हेंचा गौतमी पाटीलला पाठिंबा, म्हणाले, “ती अजूनही लहान आणि…” https://www.instagram.com/p/CnlZ2qDo0Aa/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA== जावेद व शबाना यांची लव्हस्टोरी प्रचंड गाजली. शबाना व जावेद सुखाचा संसार करत आहेत. पण लग्न करणं या दोघांसाठी अगदी कठीण होतं. “जावेद यांना आधीच दोन मुलं होती. मुलांमुळे आम्ही एकमेकांपासून तीन वेळा विभक्त होण्याचाही निर्णय घेतला. पण आम्ही एकमेकांपासून दूर राहणं शक्य झालं नाही. आज माझं सगळ्यांबरोबरच चांगलं नातं आहे ही समाधानकारक गोष्ट आहे. हनी (जावेद यांची पहिली पत्नी) आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहे". असं शबाना यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं.