लोकप्रिय अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) व गीतकार, पटकथा लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडपे आहे. नुकतीच त्यांच्या लग्नाला ४० वर्षे पूर्ण झाली. शबाना आझमी व जावेद अख्तर अनेकदा त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलताना दिसतात. अनेक मुलाखतींत ते त्यांच्या आयुष्यातील मजेशीर किस्से सांगतात. आता शबाना आझमींनी एका मुलाखतीत जावेद अख्तर यांच्याबरोबरचे नाते सुरुवातीच्या काळात कसे होते, कोणी पहिल्यांदा प्रेम व्यक्त केले याबद्दल वक्तव्य केले आहे.

काय म्हणाल्या शबाना आझमी?

अभिनेत्री शबाना आझमी यांनी ‘रेडिओ नशा ऑफिशियल’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी म्हटले, “माझ्या आईने मला सांगितले होते की, शायर व कवी यांच्यामध्ये अडकू नकोस. ते चांगले चांगले शब्द बोलून त्यातच फसवतील आणि मी त्यातच अडकले. मला माहीत नव्हते की, आमच्यामधील कोण पहिल्यांदा प्रेम व्यक्त करणार. पण, आम्हाला एकमेकांशी बोलायला आवडायचे. इतर कोणत्याच गोष्टी कळायच्या नाहीत. एकदा आम्ही आमचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला होता. कारण- परिस्थिती कठीण होती. त्यानंतर आम्ही तीन महिने एकमेकांशी बोललोच नाही. एकदा शेवटचे भेटू या विचाराने आम्ही भेटलो. बाकीच्या सर्व गोष्टींबद्दल खूप बोललो आणि शेवटी आमचे नाते संपवण्याचा विचार सोडून दिला”, अशी आठवण शबाना आझमींनी सांगितली आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

जावेद अख्तर यांच्याबद्दल पुढे बोलताना त्यांनी म्हटले, “ते खूप प्रामाणिक आहेत. ते त्यांच्यापेक्षाही वयाने लहान लोकांशी नम्रतेने बोलतात, हे मला खूप आवडते. त्यांची जी तत्त्वे आहेत तीसुद्धा मला फार आवडतात. याबरोबरच त्यांची विनोदबुद्धी व हुशारी हे गुणसुद्धा मला फार आवडतात.”

जावेद अख्तर व त्यांच्यामध्ये काय फरक आहे? यावर बोलताना त्यांनी म्हटले, “मी खूप विस्ताराने व छोट्या गोष्टींचा विचार करते आणि ते प्रत्येक गोष्टीचा मोठा विचार करतात. आम्ही जेव्हा आमचे घर बांधत होतो, त्यावेळी आमच्यात वाद झाला होता. मी आठवड्याच्या शेवटी आराम करण्यासाठी कॉटेजचा विचार करत होते; मात्र त्यांनी मोठे घर बांधायचे ठरवले. आम्ही या गोष्टीवरून भांडलो होतो. त्यावेळी त्यांच्या मित्राने मला सांगितले की, जावेदजींना एकेकाळी रस्त्यावर झोपावे लागले आहे. तीन-तीन दिवस अन्नाशिवाय उपाशी राहावे लागले आहे. हे घर बांधणे त्यांचे स्वप्न आहे. तू तुझे आयुष्य उत्तमपणे जगशील. त्यामुळे त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करू दे. शेवटी, तू ‘अंकुर’चा विचार करणार आणि जावेदजी ‘शोले’चा विचार करणार.”

हेही वाचा: ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई! मालिकेतील कलाकारांनी केलं केळवण, सुंदर सजावटीने वेधलं लक्ष

दरम्यान, ९ डिसेंबर २०२४ ला जावेद अख्तर व शबाना आझमी यांनी लग्नाचा ४० वा वाढदिवस साजरा केला. आता शबाना आझमींना नवीन चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Story img Loader