हॉलीवूड अभिनेता पॅट्रिक स्वेझ हा त्याच्या अभिनयासाठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. घोस्ट (Ghost) या रोमँटिक चित्रपटातून आणि पॉइन्ट ब्रेक या ॲक्शन चित्रपटातून त्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते. महत्त्वाची बाब अशी, त्याचा ‘सिटी ऑफ जॉय’ हा चित्रपट गंभीर होता, मात्र तरीही तो प्रेक्षकांना आकर्षित करणारा होता. या चित्रपटाचे शूटिंग जुन्या कोलकाता शहरात झाले होते. या चित्रपटात शबाना आझमी आणि ओम पुरी यांनीदेखील महत्त्वाची भूमिका साकारली होती.

शबाना आझमींनी फेय डिसुझाला दिलेल्या एका मुलाखतीत ‘सिटी ऑफ जॉय'(City Of Joy) या चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. त्यांनी म्हटले, “सिटी ऑफ जॉयमध्ये ओम पुरी यांच्याबरोबर काम करणे ही दिलासा देणारी गोष्ट होती. पॅट्रिक स्वेझला ओम पुरी यांच्याबद्दल आदरयुक्त भावना होती. दिग्दर्शक रोलँड जोफ यांना त्याला आठवून द्यावे लागले की, अभिनय करताना तुझ्या हावभावातून ती भावना येऊ देऊ नकोस.”

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
Shabana Azmi and sanjjev kumar
“तुझ्याकडे थोडी प्रतिभा असती तर….”, शबाना आझमी यांनी सांगितली संजीव कुमार यांची आठवण; म्हणाल्या, “सगळ्यात भयानक…”
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल

“लोक जेवायला बोलवायचे तेव्हा आम्ही…”

कलाकरांबरोबरच चित्रपटात कोलकाता शहराची महत्त्वाची भूमिका होती. शबाना आझमी यांनी या शूटिंगदरम्यानच्या त्यांना आणि ओम पुरी यांना खाणे खूप आवडायचे, याची आठवण सांगताना त्यांनी म्हटले, “मी आणि ओम पुरी यांनी हॉटेलमधील संपूर्ण मेनू संपवले होते आणि जर आम्हाला लोकांनी जेवायला आमंत्रित केले तर तिथेसुद्धा जात असू; आम्ही ज्या ठिकाणी जेवायला जायचो तिथे आम्ही आमच्याबरोबर डबे घेऊन जायचो आणि त्यातून आम्ही एकमेकांसाठी जेवण आणत होतो.”

“कोलकाता हे एक मोठी लोकसंख्या असलेले शहर आहे. एका सीनवेळी लोकांना कळले की इथे शूटिंग चालू आहे. हे समजताच लोकांनी गर्दी करायला सुरुवात केली. गर्दी वाढू लागली आणि शूट करणे अशक्य झाले. यातून मार्ग काढण्यासाठी मला एक गोष्ट सुचली.”

“एकदा आम्ही रजनीकांत यांच्याबरोबर उटीमध्ये शूटिंग करत होतो. त्यावेळीदेखील मोठी गर्दी झाली. मला माहीत नव्हते की, काय करायचे. रजनीकांत आले, ते गर्दीबरोबर तमिळमध्ये बोलले. त्यांनी त्यांना सांगितले की, शूटिंगसाठी जागा द्या. मुंबईमधील कलाकार आले आहेत आणि चांगले वागणे हे महत्त्वाचे आहे. त्यांच्या या बोलण्यानंतर गर्दी दूर झाली, हे पाहून मी आश्चर्यचकित झाले होते. जेव्हा कोलकातामध्ये तसेच झाले तेव्हा मी आणि ओम पुरी यांनी लोकांना सांगितले की, पश्चिमेकडून आपल्याकडे कलाकार पाहुणे आले आहेत आणि आपण उत्तम वागणे महत्त्वाचे आहे. गर्दीतल्या सर्वांनी मान हलवली, बाकी काहीच केले नाही. आम्हाला आमचे शूट कॅन्सल करावे लागले.”

हेही वाचा: सलमान खान करणार होता ‘गजनी’त मुख्य भूमिका, पण ‘या’ कारणाने आमिरची लागली वर्णी, खलनायकाने केला मोठा खुलासा

शबाना आझमी यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्या नुकत्याच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसल्या होत्या. लवकरच त्या राजकुमार संतोषी यांच्या ‘लाहोर १९४७’ या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट २६ जानेवारी २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader