Shah Rukh Khan Ajmer Sharif Fakir Story: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान हा यशाच्या शिखरावर आहे. प्रचंड मेहनत आणि कामाने त्याने बादशाह म्हणून स्वतःची सिनेविश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण, दिल्लीहून मुंबईमध्ये एक स्वप्न घेऊन आलेल्या शाहरुखच्या यशामागे आणखी एका व्यक्तीचे आशीर्वाद आहेत. शाहरुख खानला एका फकीराने अनोखी दुआ दिली होती. एका फकीराने दिलेल्या आशीर्वादानंतर शाहरुख खान आज प्रचंड यश, संपत्ती आणि प्रसिद्धीच्या शिखरावर आहे.

जनसत्ताच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खान हा बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी त्याला एक फकीर भेटला होता. दिल्लीमध्ये राहत असताना शाहरुखची आई आजारी पडली होती. त्यानंतर शाहरुख त्याच्या आईसह अजमेर शरीफ या दर्ग्यामध्ये प्रार्थना करण्यासाठी गेला होता. डोक्यावर चादर घेऊन आईबरोबर दर्ग्यामध्ये गेल्यानंतर त्याला आईने पाच हजार रुपये नीट जपून ठेवण्यासाठी दिले होते; पण गर्दीमध्ये ते पैसे शाहरुखकडून हरवले आणि तो सगळीकडे तो शोधू लागला.

शाहरुख खानला फकीराने काय दिलेली दुआ?

दर्ग्याच्या आसपासच्या परिसरामध्ये शाहरुख खान हरवलेले पैसे शोधत असताना त्याला एक फकीर भेटला. यावेळी त्या फकिराने त्याला विचारले, ‘काही हरवले आहे का?’ त्यावर शाहरुखने ‘हो…’ असे उत्तर दिले. पण यानंतर फकीर स्वतः म्हणाला की, “पाच हजार हरवले आहेत ना?” हरवलेल्या पैशांचा थेट आकडा सांगितल्यामुळे शाहरुखसुद्धा आश्चर्यचकित झाला होता. पुढे फकीर म्हणाला, “इथे आलेला कोणीच रिकाम्या हातानं घरी जात नाही. आता पाच हजार गमावले आहेस, पुढे जाऊन ५०० कोटी कमावशील.”

Bollywood Superstar Shah Rukh Khan sharing story of Ajmer Sharif fakir blessing in interview.
शाहरुख खान (फोटो – इन्स्टाग्राम)

शाहरुख खानचा या गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता. मात्र, त्याला स्वतःला आलेल्या या अनुभवामुळे त्यालाही आश्चर्य वाटले होते. त्यामुळेच त्याच्या प्रचंड यशामागे शाहरुख खान त्याच्या मेहनतीबरोबर फकीराचा आशीर्वाद यांचाआवर्जून उल्लेख करतो. एका मुलाखतीत शाहरुख खान याबाबत म्हणालेला, “माझ्यावर अजमेर शरीफची दुआ आहे, दया आहे. ही केवळ पैशांची गोष्ट नाही; पण मी नावही खूप कमावलं आहे आणि चांगल्या गोष्टीही मिळवल्या आहेत.”

Bollywood Superstar Shah Rukh Khan sharing story of Ajmer Sharif fakir blessing in interview.
शाहरुख खानला मिळालेला आशीर्वाद (फोटो – इन्स्टग्राम)
Bollywood Superstar Shah Rukh Khan sharing story of Ajmer Sharif fakir blessing in interview.
शाहरुख खान (फोटो – इन्स्टाग्राम)

दरम्यान, शाहरुख खानने १९८९ मध्ये ‘फौजी’ व ‘सर्कस’ अशा मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर १९९२ मध्ये ‘दीवाना’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटाद्वारे त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. ९० च्या दशकामध्ये सुरू झालेल्या शाहरुखचा बॉलीवूडमधील प्रवास अजूनही सुरू आहे. लवकरच त्याचा ‘किंग’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.