scorecardresearch

सुहाना खान करणार वडील शाहरुख खानच्या चित्रपटात काम; ‘या’ दिवशी होणार शूटिंगला सुरुवात

शाहरुख खान आणि त्याची लाडकी लेक सुहाना लवकरच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.

suhana and sharukh khan
शाहरुख आणि सुहान झळकणार एकाच चित्रपटात

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित ‘डंकी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘पठाण’ आणि ‘जवान’च्या यशानंतर चाहते शाहरुखच्या डंकी चित्रपटाची वाट बघत आहे. तर दुसरीकडे शाहरुखची लाडकी लेक सुहाना खानही ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदापर्ण करणार आहे. दरम्यान शाहरुख आणि सुहाना खानच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

हेही वाचा- पाच अभिनेत्यांनी नाकारली भूमिका, पण ‘या’ चित्रपटाने पटकावलेले चार राष्ट्रीय पुरस्कार, अवघ्या १६ कोटींचे बजेट अन् कमावलेले ५२ कोटी

jawan
शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपटगृहांनंतर ओटीटीवर घालणार धुमाकूळ; वाचा कधी व कुठे पाहता येणार?
Rajveer Deol Paloma-starrer Dono box office collection day 1
सनी देओलचा मुलगा अन् पूनम ढिल्लोंच्या मुलीचं बॉलीवूड पदार्पण, राजवीर-पलोमाच्या ‘दोनों’ने कमावले फक्त ३० लाख रुपये
Bobby Deol first look posters from Ranbir Kapoor starrer Animal
रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात झळकणार बॉबी देओल; त्याचा जबरदस्त लूक पाहून चाहते म्हणाले, “सिस्टम हँग केलं…”
the-great-indian-family-box-officeday2
शाहरुखच्या ‘जवान’पुढे विकी कौशलचा ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ पडला फिका; दुसऱ्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी

मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख त्याची लाडकी लेक सुहानाबरोबर स्क्रिन शेअऱ करणार आहे. लवकरच या दोघांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणर आहे. सुजॉय घोष या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. अद्याप या चित्रपटाची घोषणा करण्यात आली नसली तरी जानेवारीमध्ये या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या जवान आणि पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली होती. येत्या २२ डिसेंबरला त्याचा डंकी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखबरोबर तापसी पन्नू, विक्की कौशल यांची प्रमुख भूमिका आहे. शाहरुखच्या अगोदरच्या चित्रपटांची कमाई पाहता बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट जबरदस्त कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा- “दोन व्यक्तींमधील नातं…” सारा अली खानच्या ब्रेकअपबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावर कार्तिक आर्यन झाला नाराज; म्हणाला ” स्वत:चा मान…”

सुहानाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर तिचा ‘द आर्चीज’ चित्रपट ७ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तरने केलं आहे. होत आहे. या चित्रपटात सुहानाबरोबर बोनी कपूर यांची छोटी मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांची नातू अगस्त्य नंदा मिहिर आहुजा, आदिती सहगल, युवराज मेंडा आणि वेदांग रैना यांची प्रमुख भूमिका आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shah rukh khan and suhana khan to start shooting for sujoy ghosh film dpj

First published on: 21-11-2023 at 20:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×