Premium

Video : शाहरुख खानने खरेदी केली भारतातील सर्वात महागडी कार, नंबर प्लेट आहे खास

‘पठाण’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर शाहरुखने ही गाडी खरेदी केल्याचे बोललं जात आहे.

shah rukh khan new car video
शाहरुख खानच्या नव्या गाडीचा व्हिडीओ समोर

अभिनेता शाहरुख खान हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता. सध्या तो त्याच्या आगामी ‘जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहरुख खानचा पठाण चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. पठाणच्या यशानंतर आता शाहरुख खानने नवीन गाडी खरेदी केली आहे. त्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूडचा किंग अशी ओळख असलेल्या शाहरुख खानने नुकतंच रोल्स-रॉयस ही गाडी खरेदी केली आहे. शाहरुख खानने खरेदी केलेली गाडी ही रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बॅज एसयुव्ही या प्रकारातील आहे. भारतातील सर्वात महागडी गाडी म्हणून तिला ओळखले जाते. या आलिशान गाडीची किंमत ८ कोटींहून अधिक आहे. तर या कारची ऑन रोड किंमत १० कोटी इतकी असल्याचे बोललं जात आहे.
आणखी वाचा : “हॉलिवूडपेक्षा बॉलिवूड चांगले” शाहरुखच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रियांका चोप्राचा संताप, म्हणाली “डोक्यात हवा…”

नुकतंच शाहरुखच्या या नव्या कोऱ्या गाडीची झलक समोर आली आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुखने खरेदी केलेली गाडी ही पांढऱ्या रंगाची आहे. शाहरुखने त्याचा लकी नंबर हा गाडीचा नंबर म्हणून घेतला आहे. शाहरुखच्या गाडीचा नंबर ‘५५५’ असा आहे. ‘पठाण’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर शाहरुखने ही गाडी खरेदी केल्याचे बोललं जात आहे.

आणखी वाचा : शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यात मध्यरात्री दोघांची घुसखोरी, सुरक्षा असूनही घटना घडल्याने खळबळ

शाहरुख खानबरोबरच ‘एटली’ चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि अभिनेता विजय सेतुपतीदेखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तसेच शाहरुख खान सलमान खानच्या ‘टायगर ३’ चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 09:58 IST
Next Story
‘बिग बँग थिअरी’ शो मध्ये माधुरी दीक्षितविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप, नेटफ्लिक्सला नोटीस