चाहत्यांचा लाडका शाहरुख खानचा दुबईतील एका कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. सुपरस्टार शाहरुख खानने या कार्यक्रमात इतका जबरदस्त डान्स केला की त्याला पाहून सगळेच थिरकले. किंग खानचे दुबईतील अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यापैकी शाहरुखच्या आणखी एका व्हिडीओची जोरदार चर्चा आहे, कारण यात तो त्याची सासू सविता छिब्बरबरोबर डान्स करताना दिसत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान सासू सविता छिब्बर यांचा हात धरून नाचताना दिसत आहे. आपल्या जावयाबरोबर डान्स करताना सविता थोड्या लाजत होत्या. सासू व जावयाचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – काजोल प्रवास करत असलेलं विमान क्रॅश झालंय; अभिनेत्रीच्या आईला कोणीतरी फोन करून सांगितलं अन्…; काय घडलेलं?
शाहरुख खानचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘झूम जो पठाण’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तो या गाण्याची हुक स्टेप करताना दिसतोय. त्याला पाहून चाहतेदेखील या गाण्यावर थिरकतात. नंतर जेव्हा किंग खानने दोन्ही त्याची सिग्नेचर पोज दिली तेव्हा चाहते आनंदाने ओरडू लागले. दुबईतील हा कार्यक्रम त्याचा मुलगा आर्यन खानने आयोजित केला होता.
कामाबद्दल बोलायचे झाल्यास शाहरुख खान शेवटचा ‘डंकी’ सिनेमात दिसला होता. हा चित्रपट डिसेंबर २०२३ मध्ये रिलीज झाला होता. यामध्ये विकी कौशल, तापसी पन्नू, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर हे कलाकार होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. हा सिनेमा राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केला होता. आता शाहरुख खान ‘किंग’ चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये त्याची मुलगी सुहाना खानही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सुजॉय घोष या सिनेमाचा दिग्दर्शक आहे. ‘किंग’मध्ये अभिषेक बच्चन नकारात्मक भूमिकेत असेल.