बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाने देशातच नाही तर जगभरात धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने जगभरातील कमाईनं १००० कोटींचा आकडा पार केला आहे. त्यामुळे पुन्हा ‘जवान’ने आणखी एक रेकॉर्ड मोडला आहे. जागतिक स्तरावर शाहरुखच्या या चित्रपटाने या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रेकॉर्ड मोडत ‘पठाण’ला मागे टाकलं आहे. शिवाय देशांतर्गत २४व्या दिवशी ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केल्याचं समोर आलं आहे.
हेही वाचा – Video: ‘दार उघड बये’ ७ ऑक्टोबरला प्रेक्षकांचा घेणार निरोप; शूटिंगच्या शेवटच्या दिवसातील काही खास क्षण पाहा
७ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ चित्रपटाने जागतिक स्तरावर १००० कोटींचा आकडा खूप वेगाने पार करत इतिहास रचला आहे. ‘पठाण’चा वर्ल्डवाइड लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड अखेर ‘जवान’ने मोडला आहे. सॅकनिल्क (SACNILC)च्या रिपोर्टनुसार, जागतिक स्तरावर ‘जवान’ने १०५५ कोटींपेक्षा अधिक कलेक्शन करून २०२३मधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.
२४व्या दिवसाच्या देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरील कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, सॅकनिल्क (SACNILC)च्या रिपोर्टनुसार, शाहरुखच्या या चित्रपटाने २३व्या दिवशी फक्त ५.०५ कोटींचा गल्ला जमवला होता. पण २४व्या दिवसाच्या कमाईत चांगली वाढ झाल्याचं पाहायला मिळाल. शनिवारी, २४व्या दिवशी ‘जवान’ने ९.२५ कोटींची कमाई केली. यासह चित्रपटाची एकूण कमाई ५९६.२० कोटी झाली आहे.
हेही वाचा – Video: लहान मुलगा बोबड्या बोलात म्हणाला ‘ऐश्वल्या लाय’, अभिनेत्रीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल
शाहरुखच्या ‘जवान’ने प्रदर्शनानंतरच्या चौथ्या शनिवारी ९.२५ कोटींचा गल्ला जमवून सनी देओलचा ब्लॉकबस्टर ‘गदर २’चा रेकॉर्ड मोडला आहे. सनी देओलच्या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतरच्या २४व्या दिवशी फक्त ७.८ कोटींची कमाई केली होती.
हेही वाचा – “तू हिंदी चित्रपट, सीरिजमध्ये काम का करत नाहीस?” हेमांगी कवीने समीर चौघुलेंचा व्हिडीओ शेअर करत दिलं उत्तर…
दरम्यान, आता ‘जवान’नंतर शाहरुखचा ‘डंकी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहेत. २२ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखबरोबर अभिनेत्री तापसी पन्नू झळकणार आहे.