Director Atlee Blessed With Baby Girl : २०२३ मध्ये आलेल्या शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचा दिग्दर्शक अ‍ॅटलीने काही दिवसांपूर्वी तो बाबा होणार असल्याची गुडन्यूज शेअर केली होती. सोशल मीडिया पोस्ट शेअर करत त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. अशातच आता दिग्दशर्काच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे.

अ‍ॅटलीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत बाबा झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे. अ‍ॅटली दुसऱ्यांदा बाबा झाला असून त्याच्या घरी लक्ष्मीचा आगमन झाले आहे. अ‍ॅटलीने त्याचा पहिला मुलगा मीरचा कार्टूनवाला फोटो शेअर केला आहे आणि त्यावर “मला छोटी बहीण झाली” असं लिहिल्याची पोस्ट शेअर केली आहे.

त्याचबरोबर प्रिया आणि ॲटली यांनी आम्हाला २० एप्रिल रोजी कन्यारत्न प्राप्त झाले असल्याची माहितीसुद्धा या पोस्टद्वारे आली आहे. अ‍ॅटलीने शेअर केलेल्या या पोस्टवर दाक्षिणात्य तसेच बॉलीवूड मनोरंजन सृष्टीतल्या अनेकांनी प्रतिक्रियांद्वारे दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री अनन्या पांडे, काजल अग्रवाल, समांथा रुथ प्रभू, निशा अग्रवाल, हुमा कुरेशीसह अनेक कलाकारांनी अ‍ॅटलीने शेअर केलेल्या पोस्टखाली “अभिनंदन” अशी कमेंट करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अ‍ॅटलीच्या चाहत्यांनीसुद्धा आई-वडील झाल्यानिमित्त दोघांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

अ‍ॅटली-प्रिया यांना तीन वर्षांचा मुलगा आहे. ३१ जानेवारी २०२३ रोजी त्याचा जन्म झाला होता. पहिल्या लेकाच्या जन्मानंतर आता तीन वर्षांनी अ‍ॅटली-प्रिया दुसऱ्या बाळाचं स्वागत केलं आहे. मुलानंतर आता अ‍ॅटली-प्रिया मुलीचे पालक झाले आहेत.

दरम्यान, अ‍ॅटलीच्या दिग्दर्शकीय कामाबद्दल सांगायचं झाल्यास, तो ‘राजा राणी’, ‘थेरी’, ‘मर्सल’, आणि ‘बिगिल’ यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत नाव कमावल्यानंतर त्याने शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाद्वारे बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली.

अ‍ॅटलीने दिग्दर्शित केलेला ‘जवान’ हा चित्रपट शाहरुखच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्यापैकी एक सिनेमा ठरला होता. ‘जवान’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या सिनेमात शाहरुख खान आणि अभिनेत्री नयनताराची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. यामुळे तामिळ दिग्दर्शक अ‍ॅटलीचंही विशेष कौतुक झालं.

दिग्दर्शनाबरोबरच अ‍ॅटली निर्माता म्हणूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ चित्रपटातून तो निर्माता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. अ‍ॅटली सोशल मीडियावरही सक्रीय असतो. अशातच आता अ‍ॅटली पुन्हा एकदा बाबा झाला आहे.