scorecardresearch

“सुहानाने मला…” शाहरुखने सांगितलं ४ वर्षे कामातून ब्रेक घेण्यामागचं खरं कारण

शाहरुख खानने जवळपास ३२ वर्षांच्या करिअरनंतर ४ वर्षांचा ब्रेक घेतला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने यामागचं कारण स्पष्ट केलं आहे

“सुहानाने मला…” शाहरुखने सांगितलं ४ वर्षे कामातून ब्रेक घेण्यामागचं खरं कारण
शाहरुखने ४ वर्षे कामातून ब्रेक घेण्याचं कारण मुलगी सुहाना असल्याचं स्पष्ट केलं.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान लवकरच ‘पठाण’ चित्रपटातून कमबॅक करणार आहे. जवळपास ४ वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर परतत आहे. पण ‘झिरो’ चित्रपटानंतर शाहरुखने कोणत्याच चित्रपटात काम केलं नव्हतं. तसेच कोणताही चित्रपट साइन केला नव्हता. जेव्हा त्याला यामागचं कारण एका मुलाखतीत विचारण्यात आलं तेव्हा त्याने मुलगी सुहानाचं नाव घेतलं आणि ४ वर्षे ब्रेक घेण्यामागचं कारण सांगितलं.

शाहरुख खानने नुकतीच सौदी अरेबियाच्या जेद्दा येथे सुरू असलेल्या ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुखने ४ वर्षे कामातून ब्रेक घेण्याचं कारण मुलगी सुहाना असल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान शाहरुख खानचा ‘पठाण’ येत्या जानेवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर दुसरीकडे त्याची मुलगी सुहाना जोया अख्तरच्या ‘द आर्चिज’मधून बॉलिवूड पदार्पण करणार आहे.

आणखी वाचा- “मी ५७ वर्षांचा आहे पण…” शाहरुख खानने मुलाखतीदरम्यान व्यक्त केली मनातील खदखद

शाहरुख खान ‘डेडलाइन’शी बोलताना म्हणाला, “सुहानाने मला कधीच कॉल केला नाही आणि मी कोणताही चित्रपट साइन केला नाही. मी हाच विचार करत राहिलो की कदाचित ती मला कॉल करेल. आज करेल, नंतर करेल. शेवटी मग एक दिवस मी तिला फोन केला आणि तिला म्हणालो, “आता तरी मी माझं काम सुरू करू शकतो का?” त्यावर तिने मला विचारलं, “तुम्ही काम का करत नाही आहात?” मी म्हणालो, “मला वाटलं न्यूयॉर्कमध्ये तुला एकटं वाटलं तर तू मला फोन करशील आणि त्यावेळी मी तुझ्याबरोबर असायला हवं.”

सुहाना खान फिल्म स्टडीसंदर्भातील एका कोर्ससाठी लंडनमधून अमेरिकेला शिफ्ट झाली होती. सुहाना लवकरच ‘द आर्चिज’मधून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे शाहरुख खान ‘पठाण’ चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्यासह दिसणार आहे. याशिवाय तो ‘जवान’ या चित्रपटातही दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 10:09 IST

संबंधित बातम्या