scorecardresearch

शाहरुख खानच्या ‘पठाण’चं यश पाहून गौरी खान झाली भावूक; सुहाना व आर्यनची ‘अशी’ होती प्रतिक्रिया

Pathaan Movie: प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘पठाण’ चित्रपटाने ५७ कोटींची कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले.

suhana khan on shah rukh khan pathaan movie
'पठाण'चे यश पाहून गौरी खान भावूक. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने तब्बल चार वर्षांनंतर ‘पठाण’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ५७ कोटींची कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले. तर दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने ७२ कोटींची कमाई केली.

‘पठाण’ला मिळणारं यश पाहून शाहरुख खानची पत्नी गौरी खान भारावून गेली आहे. ‘बॉलिवूड लाइफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘पठाण’च्या प्रदर्शनादिवशी शाहरुखने कुटुंबीय व मित्रपरिवारासाठी छोट्या पार्टीचं आयोजन केलं होतं. ‘पठाण’ला मिळणाऱ्या यशामुळे गौरी खान पार्टीत भावूक झाल्याचे पार्टीतील उपस्थितांपैकी एका सदस्याने सांगितलं. ‘पठाण’चे यश पाहून गौरी खानच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचीही माहिती त्याने दिली आहे.

हेही वाचा>> Video: हातात दारुचा ग्लास अन् कंगना रणौतचा डान्स; पार्टीतील व्हिडीओमुळे अभिनेत्री ट्रोल, नेटकरी म्हणाले “हिंदू धर्म…”

‘पठाण’बाबत शाहरुखची मुलं सुहाना व आर्यन खान यांच्या प्रतिक्रियांबद्दलही माहिती समोर आली आहे. ‘पठाण’ला मिळणारा प्रतिसाद पाहून सुहाना व आर्यन खान खूश आहेत. परंतु, ‘पठाण’च्या यशाबद्दल त्यांना अगोदरच अंदाज होता, असंही त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा>> “…घरी येऊन घाल मला लग्नाची मागणी”, शिवाली परबचा व्हिडीओ चर्चेत

शाहरुख खानसह ‘पठाण’ चित्रपटात दीपिका पदुकोण व जॉन अब्राहमही मुख्य भूमिकेत आहेत. ‘पठाण’नंतर शाहरुख जवान व डंकी या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 11:35 IST
ताज्या बातम्या