Manish Chaudhari on Shah Rukh Khan: शाहरुख खान हा असा अभिनेता आहे, ज्याच्या फक्त अभिनयाचेच नाही तर त्याच्या स्वभावाचेही कौतुक होते. त्याचे अनेक सहकलाकार त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगतात. तो त्याच्याबरोबर काम करणाऱ्या कलाकारांबरोबर कसे वागतो याची अनेक उदाहरणे आजपर्यंत बऱ्याचजणांनी सांगितली आहेत. अभिनेत्याच्या दयाळूपणाचे अनेक कलाकार कौतुक करतात. शाहरुख जितका कलाकार म्हणून चांगला आहे, तितकाच तो माणूस म्हणूनही उत्तम असल्याचे वक्तव्य कलाकारांनी केले.

अनेक कलाकार शाहरुखला भेटल्यानंतर त्याचे चाहते होतात. लोकप्रिय अभिनेता मनीष चौधरीने नुकतीच एका मुलाखतीत शाहरुख खानबरोबरच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला.

“त्या सीनमध्ये माझे पात्र पडद्यावर पूर्णपणे…”

मनीष चौधरीने नुकतीच शोशाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, “आर्यन खानने दिग्दर्शित केलेल्या बॅड्स ऑफ बॉलीवूड या शोमध्ये आम्ही एका सीनचे रात्रीच्या वेळी शूटिंग करत होतो. तो स्पामधील सीन आहे. त्यामध्ये रोब घातला नव्हता. त्यामुळे त्या सीनमध्ये माझे पात्र पडद्यावर पूर्णपणे नग्न दिसते. आम्ही ते शूट करत होतो आणि मला बाथरूमला जायचे होते. अर्थातच, मी माझ्या साध्या कपड्यांमध्ये बाथरूमला गेलो.त्यावेळी माझ्या संपूर्ण शरीराला तेल लावले होते. तिथे शाहरुख खान होते. जेव्हा शाहरुख खान यांनी मला पाहिले तेव्हा ते मला मीठी मारायला आले. मी तेलाने माखलेलो असल्यामुळे त्यांना म्हणालो की सर, तुम्ही आता मला भेटले पाहिजे असे वाटत नाही.”

या भेटीनंतर तीन-चार दिवसांनी पुन्हा शाहरुख खान व मनीश चौधरी यांची भेट झाली. तेव्हा आर्यनने ओळख करून दिली. मनीष म्हणाला, “आर्यन त्याच्या वडिलांना म्हणजेच शाहरुख खानला म्हणाला की मनीषला भेटा. त्यावर शाहरुख माझ्याकडे पाहून म्हणाला की आपण भेटलो आहे. तेव्हा तू नग्न होतास. तर अशी शाहरुख बरोबर भेट झाली होती.”

आर्यन खान दिग्दर्शित बॅड्स ऑफ बॉलीवूडमध्ये मनीष चौधरीने एका चित्रपट निर्मात्याची भूमिका साकारली होती. याआधी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता म्हणालेला की शाहरुख सर मला चांगला निर्माता म्हणाले होते. त्यांना भेटणे कायमच प्रेरणादायी होते.

दरम्यान, आर्यन खानने दिग्दर्शित केलेला पहिलाच शोला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. आता आगामी काळात तो कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.