Shah Rukh Khan tops brand value: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानने २०२५ मध्येही भारतातील सर्वाधिक मूल्यवान सेलिब्रिटी ब्रँड म्हणून पहिले स्थान कायम राखले आहे. त्याच्या पाठोपाठ रणवीर सिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘धुरंधर’ सिनेमाने जगभरात बॉक्स ऑफिसवर केलेल्या कमाईनंतर रणवीरच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ झाली आहे. अभिनेत्रींमध्ये आलिया भट्ट सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेली अभिनेत्री ठरली असून, ती सहाव्या क्रमांकावर आहे. तिच्यानंतर दीपिका पादुकोण सातव्या स्थानी आहे.

शाहरुख खान ठरला सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेला भारतीय अभिनेता

Kroll India Celebrity Brand Valuation 2025 च्या अहवालानुसार, गेल्या वर्षी शाहरुख खानचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. तरीही तो या लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर आह. विशेष म्हणजे, त्याचा शेवटचा चित्रपट तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ चित्रपट डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता.

मात्र, शाहरुखची ब्रँड व्हॅल्यू त्याच्या चित्रपटांवरच अवलंबून नाही. तो भारतासह जगभरातील अनेक आघाडीच्या FMCG ब्रँड्सची जाहिरात करतो. त्याशिवाय त्याच्या मालकीच्या इंडियन प्रीमियर लीगमधील कोलकाता नाईट रायडर्स या संघाचाही त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठा वाटा आहे. त्याची निर्मिती संस्था रेड चिलीज एंटरटेन्मेंट हिचाही त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये समावेश आहे. गेल्या वर्षी शाहरुख खानच्या मुलाने दिग्दर्शित केलेली द बॅड्स ऑफ बॉलीवूड वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. त्याची निर्मिती रेड चिलीज एंटरटेन्मेंटने केली होती. शाहरुख खानच्या २०२५ मधील ब्रँड व्हॅल्यूचा अंदाज १७७.९ दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे १,६९४ कोटी रुपये इतका वर्तवण्यात आला आहे.

शाहरुख खाननंतर दुसऱ्या क्रमांकावर रणवीर सिंग आहे. डिसेंबर २०२५ मध्ये रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेला धुरंधर हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने सर्वाधिक कमाई केली होती. रणवीर सिंगची गेल्या वर्षीची ब्रँड व्हॅल्यू १६२.९ दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे १,५५० कोटी रुपये इतकी असल्याचा अंदाज आहे.

रणवीरनंतर तिसऱ्या स्थानावर विराट कोहली, चौथ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आणि पाचव्या स्थानावर एम एस धोनी आहे. सहाव्या स्थानावर आलिया भट्ट आहे. शाहरुख खानप्रमाणेच आलियाचाही २०२५ मध्ये एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. मात्र, तरीही ९३.९ दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे ८९४ कोटी रुपये इतकी ब्रँड व्हॅल्यू आहे. अभिनेत्रींच्या यादीत ती पहिल्या क्रमांकावर आहे. आलियानंतर सातव्या क्रमांकावर दीपिका पादुकोण आहे. तिची ब्रँड व्हॅल्यू ८९.२ दशलक्ष डॉलर म्हणजेच ८४७.६० कोटी इतकी आहे.

दरम्यान, या लिस्टमध्ये हृतिक रोशन आठव्या क्रमांकावर, अमिताभ बच्चन नवव्या क्रमांकावर, तर अक्षय कुमार दहाव्या क्रमांकावर आहे.