Shahrukh Khan Visits Deepika Padukone at hospital : बॉलीवूडमध्ये सध्या अनेक सेलिब्रिटींच्या घरच्या बाप्पाचे आगमन, त्यांची आरास आणि विसर्जन याची चर्चा आहे. या गणेशोत्सवाच्या वातावरणात अजून एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्या लेकीची. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ८ सप्टेंबर २०२४ ला दीप-वीरच्या लेकीचा जन्म झाला. त्यानंतर अनेकांनी दीपिकाची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली, यामध्ये मुकेश अंबानी सुद्धा होते. आता नुकतंच शाहरुख खानने देखील दीपिकाची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली आहे.

दीपिका एका आठवड्यापासून रुग्णालयातच आहे. तिला गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच ७ सप्टेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिने रविवारी ८ सप्टेंबरला मुलीला जन्म दिला. दीपिका एच. एन. रिलायन्स रुग्णालयात असून, शाहरुखने तिची आणि रणवीर सिंगची नुकतीच भेट घेतली. गुरुवारी रात्री सोशल मीडियावर शाहरुखची कार हॉस्पिटललजवळ दिसल्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा…Video: दीपिका पादुकोण-रणवीर सिंग झाले आई-बाबा, मुकेश अंबानींनी दोघांची रुग्णालयात घेतली भेट

दीपिका आणि रणवीर सिंग आई-बाबा झाले आहेत. या जोडप्याला केवळ बॉलीवूड नव्हे तर हॉलिवूडचे कलाकारही शुभेच्छा देत आहेत. यामध्ये हॉलीवूड अभिनेता विल स्मिथचासुद्धा समावेश आहे. आता किंग खानने या दोघांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, असं म्हटलंय. गुरुवारी शाहरुखची कार रिलायन्स रुग्णालयात जाताना दिसली.

शाहरुख आणि दीपिकाची जोडी पडद्यावर हिट ठरली आहे. त्यांनी ‘ओम शांती ओम’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘हॅपी न्यू इयर’, आणि ‘पठाण’ या सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. खऱ्या आयुष्यातही शाहरुख आणि दीपिका चांगले मित्र आहेत. यामुळेच त्याने त्याची जवळची मैत्रीण व अभिनेत्री दीपिका पादुकोणची भेट घेतली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, लवकरच रणवीर सिंग, दीपिका पादुकोण शाहरुख खानच्या शेजारी राहायला जाणार आहेत.

हेही वाचा…रणवीर-दीपिका होणार शाहरुख खानचे शेजारी! मन्नतच्या बाजूला ‘इतक्या’ कोटींच्या घराचे बांधकाम सुरू

आणि नेटीझन्सनी सुचवली नावे

दीपिकाने रविवारी (८ सप्टेंबरला) मुलीला जन्म दिला. दीपिका आणि रणवीरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून लेकीच्या जन्माची माहिती दिली. त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर सोशल मीडियावर तिच्या नावाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. एका चाहत्याने मुलीचं नाव ‘रिधी’ ठेवावं असं सुचवलं. यामध्ये रणवीरच्या ‘र’ आणि दीपिकाच्या नावातील ‘दी’ घेतले आहे. शिवाय तिचा जन्म गणेशोत्सवादरम्यान झाला असल्यामुळे ‘रिधी’ हे नाव योग्य ठरेल, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. तसेच, काहींना ‘रविका’ हे नाव खूप आवडलं. ‘रविका’चा अर्थ सूर्याची किरणं असा होतो, आणि हे नावही खूपच सुंदर आहे, असं चाहते म्हणत आहेत.