Ganpati bappa at Mannat : अभिनेता शाहरुख खान (shah rukh khan)सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. एखाद्या विषयावर आपलं मत मांडणं, #asksrk या उपक्रमातून आपल्या फॅन्सशी गप्पा मारणं आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं यामुळे शाहरुख एक्सवर (X) इतर अभिनेत्यांपेक्षा लोकप्रिय आहे. शाहरुख एक्सवर तसेच इतर सोशल मीडिया माध्यमांवर चाहत्यांना विविध सण-उत्सवांच्या शुभेच्छा देत असतो. नुकतंच शाहरुखच्या घरी गणरायाचं आगमन झालं आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शाहरुखने आपल्या चाहत्यांना एक्स आणि इन्स्टाग्रामवरून शुभेच्छा दिल्या आहेत.
शाहरुखच्या ‘मन्नत’मध्ये गणरायाचं आगमन झालं असून त्याने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात मन्नतमध्ये विराजमान झालेला बाप्पा दिसत आहे. बाप्पाची पूजा झाली आहे असं दिसतंय. शाहरुख या फोटोमध्ये पाठमोरा उभा आहे आणि याच फ्रेममध्ये त्याच्या मन्नतमधील बाप्पाचं विहंगम रूप दिसतं आहे. शाहरुखचे केस बांधलेले दिसत आहेत.
हेही वाचा…Video: “बाप्पा मोरया रे…”, सलमान खानने भाच्यांबरोबर केली गणरायाची आरती, व्हिडीओ व्हायरल
शाहरुखने हा फोटो शेअर करताना एक संदेश लिहिला आहे. त्यात तो लिहितो, “गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पा आपल्या सर्वांना आणि आपल्या कुटुंबियांना आरोग्य, प्रेम, आणि आनंद देवो, आणि हो, भरपूर मोदकही देवो.” शाहरुखने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि चाहते या पोस्टखाली कमेंट्स करून चर्चा करत आहेत.
शाहरुख त्याच्या घरी गणपतीपासून दिवाळीपर्यंत सर्व सण साजरे करतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाहरुखच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. शाहरुखच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर तो ‘किंग’ सिनेमात दिसणार नाही, मात्र त्याचा ‘पठाण २’ हा सिनेमा येणार असल्याच्याही चर्चा आहेत.