Shahid Kapoor and Ishaan Khatter Video: सध्या एकापेक्षा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. १३ फेब्रुवारीला ‘ओ’रोमियो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात शाहिद कपूर, तृप्ती डिमरी हे प्रमुख भूमिकेत दिसले आहेत. तसेच, नाना पाटेकरदेखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसले.
शाहिद कपूर आणि ईशान खट्टरचा जबरदस्त डान्स
आता या सगळ्यात शाहिद कपूरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याचा लहान भाऊ ईशान खट्टरदेखील दिसत आहे. ओ रोमियो चित्रपटातील ‘पान कि दुकान’ या गाण्यावर ते डान्स करत असल्याचे दिसत आहे.
दोघांच्या डान्स स्टेप्स, त्यांचे हावभाव लक्ष वेधून घेत आहे. तसेच, व्हिडीओच्या शेवटी ते मस्तीदेखील करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
हृतिक रोशनने केले कौतुक
विशेष म्हणजे चाहत्यांनीच नाही तर डान्सच्या बाबतीत ज्याचे नेहमीच कौतुक होते, अशा हृतिक रोशननेदेखील शाहिद कपूरच्या व्हिडीओवर कमेंट केली आहे. हृतिक रोशनने, “खूप आवडले”, असे लिहित दोघा भावांचे कौतुक केले आहे.

एका नेटकऱ्याने लिहिले, “प्लीज, कोणीतरी त्यांना एकाच चित्रपटात कास्ट करा”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “मला वाटले होते की ईशान खूप चांगला डान्सर आहे. पण, शाहिदने सुद्धा उत्तम डान्स केला. त्या दोघांना एकत्र पाहायला खूप मजा आली”, एकाने लिहिले, “माझी नजर शाहिदवरून हटली नाही”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहे. तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.


ईशानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शाहिदला त्याच्या नवीन चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. त्याने लिहिले की मला तुझा अभिमान आहे. एक अभिनेता म्हणून सर्वोत्तम भूमिका आणि खूप यश मिळत राहो. कारण, तू त्यासाठी पात्र आहेस. अशा प्रेमळ शुभेच्छा देत ईशानने शाहिदबरोबरचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत.
ईशान आणि शाहिद सोशल मीडियावर अनेकदा रील्समध्ये एकत्र दिसतात. अनेकदा ते विनोदी रील्स शेअर करत असल्याचे पाहायला मिळते.ईशान-शाहिद या भावांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते.त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे.
ईशानच्या कामाबद्दल बोलायचे तर २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वाह!लाईफ हो तो ऐसी’ या चित्रपटात तो बालकलाकार म्हणून दिसला होता. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या बियॉंड द क्लाऊड्स या चित्रपटात तो महत्वाच्या भूमिकेत दिसला. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या धडक या चित्रपटात तो प्रमुख भूमिकेत दिसला. त्यानंतर २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या द सुटेबल बॉय, २०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या द परफेक्ट कपल आणि २०२५ मध्ये द रॉयल्समध्ये दिसला. आता आगामी काळात तो कोणत्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

