बॉलीवूड स्टार शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर नेहमी चर्चेत असतात. नुकतीच दोघांनी वरळी येथे एक मालमत्ता खरेदी केली आहे. या मालमत्तेसाठी त्यांनी तब्बल ५९ कोटींचा खर्च केला आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या माहितीनुसार, IndexTap.com द्वारे प्रवेश केलेल्या नोंदणी कागदपत्रांनुसार बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि पत्नी मीरा कपूर यांनी मुंबईतील वरळी भागातील ओबेरॉय ३६० वेस्ट प्रकल्पात सुमारे ₹ ५९ कोटींची आलिशान अपार्टमेंट खरेदी केली आहे. हे लक्झरी अपार्टमेंट ५,३९५ चौरस फूट रेरा कार्पेट क्षेत्रफळाच्या जागेवर उभी आहे आणि त्यात पार्किंगच्या तीन जागा आहेत, असं कागदपत्रांवरून कळतंय.

हेही वाचा… मनोज बाजपेयींनी सांगितली माजी क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्या भेटीची ‘ती’ आठवण, म्हणाले, “मला खूप महत्वाची…”

२४ मे २०२४ रोजी ₹५८.६६ कोटी किमतीच्या मालमत्तेचा व्यवहार नोंदविला गेला, असंही कागदपत्रांवरून दिसून आलं आहे. ही अपार्टमेंट ओबेरॉय रियल्टीने बांधलेल्या हाय-राईझच्या वरच्या मजल्यावर आहे. ही अपार्टमेंट शाहिद व मीरा कपूर या दाम्पत्याने फेब्रुवारी २०२३ मधील एका मोठ्या व्यवहारामध्ये ‘चांदक रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड’कडून विकत घेतली होती.

“चांदक रियल्टीने ही विशिष्ट अपार्टमेंट सुमारे ₹६५,००० प्रतिचौरस फूट या किमतीने खरेदी केली होती आणि आता ती ₹ १ लाख प्रतिचौरस फूट या किमतीने विकली गेली आहे. एक वर्षाच्या कालावधीत ही रक्कम ५०% पेक्षादेखील जास्त आहे,” असं एका रिअल इस्टेट सल्लागाराने हे ‘हिंदुस्तान टाइम्स’ला सांगितलं.

हेही वाचा… झी मराठीवरील ‘या’ लोकप्रिय मालिकेचा आता हिंदीमध्ये होणार रिमेक; कधी, कुठे, कशी पाहता येईल?

ओबेरॉय रियल्टीचे ३६० वेस्ट या प्रकल्पात दोन टॉवर्स आहेत; ज्यात फोर BHK, फाइव्ह BHK आणि डुप्लेक्स अपार्टमेंट्स व पेंटहाऊस आहेत. या सी व्ह्यू (sea-view) प्रकल्पाला ३६० वेस्ट असं नाव मिळालं. कारण- त्याची उंची ३६० मीटर आहे आणि सर्व अपार्टमेंट पश्चिमेकडे (वेस्ट) आहेत. हा एक रेडी-टू-मूव्ह-इन उबेर लक्झरी गृहनिर्माण प्रकल्प आहे.

कागदपत्रांनुसार, कपूर यांनी व्यवहारासाठी ₹१.७५ कोटी मुद्रांक शुल्क भरले आहे. २०१८ मध्ये शाहिद कपूरने त्याच इमारतीत ८,२८१ चौरस फूट आकाराची एक अपार्टमेंट ₹ ५५.६० कोटींना खरेदी केली होती आणि ₹ २.९१ कोटी मुद्रांक शुल्क भरले होते. म्हणजेच शाहिद कपूरने मुंबईतील वरळी येथील ओबेरॉय रियल्टीच्या ३६० वेस्ट प्रकल्पात खरेदी केलेली ही दुसरी मालमत्ता आहे.

हेही वाचा… “आयुष्य हेच एक हॉटेल…”, ‘नाच गं घुमा’च्या लेखिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली…

दरम्यान, शाहिद कपूरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर रोशन अॅण्ड्र्युज दिग्दर्शित देवा या आगामी चित्रपटात शाहिद झळकणार आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि पूजा हेगडे यांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.