scorecardresearch

शाहिद कपूरच्या घरी भाड्याने राहणार कार्तिक आर्यन, एका महिन्याचं भाडं आहे तब्बल…

कार्तिक आर्यन अभिनेता शाहिद कपूरच्या जुहू येथील घरी भाड्याने राहणार आहे.

शाहिद कपूरच्या घरी भाड्याने राहणार कार्तिक आर्यन, एका महिन्याचं भाडं आहे तब्बल…
शाहिद कपूरने कार्तिक आर्यनला घर भाडेतत्त्वावर दिलं आहे. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या चर्चेत आहे. कार्तिक गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत राहण्यासाठी घर शोधत असल्याची चर्चा होती. नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार कार्तिक बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या जुहू येथील घरी भाड्याने राहणार असल्याची चर्चा आहे.

ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कार्तिक आर्यनने शाहिद कपूरचं घर तीन वर्षांसाठी भाडेत्तत्वावर घेतलं आहे. यासाठी त्याने ४५ लाख रुपयांचं डिपोझिटही दिलं आहे. शाहिद कपूरच्या जुहू चौपाटीच्या जवळील घरी राहण्यासाठी कार्तिकला लाखोंमध्ये भाडं द्यावं लागणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कार्तिकला शाहिदीच्या घरासाठी ७.५ लाख रुपये दर महिना भाडं म्हणून मोजावे लागणार आहेत. त्याशिवाय दरवर्षी भाड्याच्या रकमेत सात टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यानुसार कार्तिकला दुसऱ्या वर्षी ८.२ लाख तर तिसऱ्या वर्षी ८.५८ लाख इतकं भाडं द्यावं लागणार आहे.

हेही वाचा>> राखी सावंतचा पती आदिल खान आहे कोट्यधीश; जाणून घ्या त्याची एकूण संपत्ती

कार्तिक आर्यनने भाडेतत्वावर घेतलेल्या शाहिद कपूरचं घर तीन हजार ६८१ स्क्वेअर फूट जागेत पसरलेलं. आहे. घराबरोबरच कार्तिकला दोन पार्किंगही वापरण्यासाठी मिळणार आहेत. शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत व कार्तिकची आई यांनी कायदेशीर कागदपत्र तयार करुन घेतली असल्याची माहिती आहे.

हेही वाचा>> ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावर शाहरुख खानने सोडलं मौन, म्हणाला “दीपिका…”

शाहिद कपूरने जुहूमधील हे आलिशान घर २०१८ साली ५५.६० कोटींना विकत घेतलं होतं. शाहिद त्याच्या कुटुंबियांसह अनेक वर्ष तिथे वास्तव्यास होता. काहीच महिन्यांपूर्वी प्रभादेवीमधील फ्लॅटमध्ये शाहिदने त्याच्या पत्नीसह गृहप्रवेश केला.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-01-2023 at 18:44 IST

संबंधित बातम्या