बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. शाहीद आणि मीराच्या जोडीला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळताना दिसतं. अभिनय आणि कामासोबतच शाहिद कायमच कुटुंबाला प्राधान्य देणं पसंत करतो. शाहीद आणि मीराचे लग्न २०१५ साली झाले होते. लग्नाच्या वेळी मीरा फक्त २१ वर्षांची होती. त्या दोघांच्या वयात १३ वर्षांचे अंतर होते. शाहिद आणि मीराच्या लग्नाला ८ वर्ष पूर्ण होत आहेत. लग्नाचा हा ८ वर्षांचा प्रवास नेमका कसा होता याबाबत शाहिदने खुलासा केला आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहिदने लग्नानंतर त्याच्या आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल सांगितले. तसेच तो मीरावर किती प्रेम करतो याबाबतही खुलासा केला आहे. शाहिद म्हणाला, “मी अजूनही दररोज मीराच्या प्रेमात पडतो. मीराबरोबर लग्न केल्यानंतर माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. यशस्वी वैवाहिक जीवनाबद्दल बोलताना, शाहिद म्हणाला आता मी हे मान्य केले आहे की माझा दृष्टीकोन नेहमीच योग्य नसतो. लग्नामुळे माणसाला त्याच्या किती चुका झाल्या आहेत आणि त्याने स्वतःबद्दल कोणत्या गोष्टी बदलल्या पाहिजेत याची जाणीव होते. सुरुवातीला मी मीराला कधी कधी एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हणायचो पण आता मी तिच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो. नवरा-बायकोमध्ये भांडण होता कामा नये कारण बायको नेहमीच बरोबर असते याची जाणीव मला लग्नाच्या ८ वर्षात झाली आहे.”
मीराबरोबरच्या त्याच्या आठ वर्षांच्या वैवाहिक जीवनातून शिकलेले गोष्टी शेअर करताना शाहिद म्हणाला की, “माझा दृष्टीकोन नेहमीच योग्य नसतो हे आता मला समजले आहे, परंतु अनेक यशस्वी पुरुषांना हे सत्य स्वीकारण्यात समस्या आहे. त्यांना वाटते की ते नेहमी बरोबर असतात, पण ते खरे नाही. एक जोडपे म्हणून त्यांनी एकमेकांचा दृष्टिकोन पाहण्यास शिकलो. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, जो त्याच्या स्वत: च्या मार्गाशी संबंधित आहे.”
शाहिदच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वी शाहिद कपूर वेब सीरिज फर्जीमध्ये दिसला होता. शाहिदचा ‘ब्लडी डॅडी’ चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहिद थ्रिलर स्टाईलमध्ये दिसणार आहे.