Premium

“माझी बायको नेहमीच…”; लग्नाच्या ८ वर्षानंतर शाहिद कपूरचे मीरा राजपूतबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला…

अभिनेता शाहीद कपूर आणि मीरा राजपूच्या लग्नाला ८ वर्ष पूर्ण झाली आहेत.

shahid kapoor and mira rahput
शाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण (छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. शाहीद आणि मीराच्या जोडीला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळताना दिसतं. अभिनय आणि कामासोबतच शाहिद कायमच कुटुंबाला प्राधान्य देणं पसंत करतो. शाहीद आणि मीराचे लग्न २०१५ साली झाले होते. लग्नाच्या वेळी मीरा फक्त २१ वर्षांची होती. त्या दोघांच्या वयात १३ वर्षांचे अंतर होते. शाहिद आणि मीराच्या लग्नाला ८ वर्ष पूर्ण होत आहेत. लग्नाचा हा ८ वर्षांचा प्रवास नेमका कसा होता याबाबत शाहिदने खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहिदने लग्नानंतर त्याच्या आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल सांगितले. तसेच तो मीरावर किती प्रेम करतो याबाबतही खुलासा केला आहे. शाहिद म्हणाला, “मी अजूनही दररोज मीराच्या प्रेमात पडतो. मीराबरोबर लग्न केल्यानंतर माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. यशस्वी वैवाहिक जीवनाबद्दल बोलताना, शाहिद म्हणाला आता मी हे मान्य केले आहे की माझा दृष्टीकोन नेहमीच योग्य नसतो. लग्नामुळे माणसाला त्याच्या किती चुका झाल्या आहेत आणि त्याने स्वतःबद्दल कोणत्या गोष्टी बदलल्या पाहिजेत याची जाणीव होते. सुरुवातीला मी मीराला कधी कधी एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हणायचो पण आता मी तिच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो. नवरा-बायकोमध्ये भांडण होता कामा नये कारण बायको नेहमीच बरोबर असते याची जाणीव मला लग्नाच्या ८ वर्षात झाली आहे.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2023 at 11:43 IST
Next Story
विकी-साराची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली; ‘जरा हटके जरा बचके’चित्रपटाने दोन दिवसांत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला