scorecardresearch

Premium

‘जब वी मेट’ चित्रपटात चष्मा लावण्यासाठी शाहिद कपूरने केलेलं भांडण; म्हणाला, “आधी निर्मात्यांना…”

“हिरो कधी चष्मा वापरतो का?”, ‘जब वी मेट’च्या निर्मात्यांशी शाहिद कपूरने केलेलं भांडण, किस्सा सांगत म्हणाला…

shahid kapoor jab we met
शाहिद कपूरने सांगितला 'जब वी मेट' चित्रपटाचा किस्सा

शाहिद कपूर हा बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून शाहिदने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जब वी मेट’ चित्रपटामुळे शाहिदला खऱ्या अर्थाने वेगळी ओळख मिळाली. ‘जब वी मेट’मध्ये त्याने साकारलेल्या आदित्य कश्यपच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अलीकडेच ‘फिल्म कंपेनियन’ला दिलेल्या मुलाखतीत शाहिदने ‘जब वी मेट’ चित्रपटातील भूमिकेबद्दल खुलासा केला आहे.

हेही वाचा : Video : प्रथमेश लघाटेने बाप्पासाठी बनवले उकडीचे मोदक, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “आता मुग्धालाही…”

ashok saraf
Video “पाहुण्यांना बसायला सांगायची पद्धत नाही का?” मराठी अभिनेत्याला दिलेल्या वागणुकीवरुन अशोक सराफांवर नेटकरी नाराज
the vaccine war
सरधोपट मांडणीत अडकलेली रंजक कथा
Jawan
‘जवान’च्या निर्मात्यांची प्रेक्षकांना खास भेट, ‘ही’ धमाकेदार ऑफर वाचलीत का? जाणून घ्या कोणाला घेता येईल लाभ
don
शाहरुख की रणवीर हा वाद सोडाच; पण मूळ ‘डॉन’ चित्रपटही बिग बींच्या आधी ‘या’ तीन कलाकारांना ऑफर झाला होता

‘जब वी मेट’ चित्रपटात आदित्य कश्यप हे पात्र चष्मा घालताना दाखवण्यात आलं आहे. परंतु, आधी निर्मात्यांना आदित्य कश्यपचा लूक चष्मा घालून दाखवणं मान्य नव्हतं. याबद्दल सांगताना शाहिद म्हणाला, “आदित्य या व्यक्तिरेखेने चष्मा घातला पाहिजे यासाठी मी सर्वांशी भांडलो. मला अनेकांनी तू वेडा आहेस का? हिरो कधी चष्मा वापरतो का? चष्मा लावून तू गाणं कसं गाणार? असं सांगण्यात आलं होतं.”

हेही वाचा : Video: लाडक्या बाप्पाला निरोप देताना ‘परी’ला कोसळलं रडू; म्हणाली, “देवबप्पा, का रे…”

शाहिद पुढे म्हणाला, “आदित्यची व्यक्तिरेखा ही चित्रपटाच्या सुरुवातीला फार वेगळी होती. त्याला ट्रेन मधून उडी मारायची असते…या सगळ्यातून गीत त्याला सावरते त्यामुळे चष्मा लावला तर काय फरत पडतो? असं माझं म्हणणं होतं. मात्र, सुरुवातीला माझं म्हणणं कोणालाच पटलं नाही. मी भांडून त्यांना समजावलं. चष्मा लावण्यामागे अजून एक कारण होतं ते म्हणजे, लोकांनी मला अनेक वर्ष सारख्याच लूकमध्ये पाहिलं होतं. माझ्या प्रत्येक चित्रपटात मी नेहमी सारखाच दिसत होतो. त्यामुळे माझ्या लूकमध्ये बदल करणं गरजेचे होतं.”

हेही वाचा : गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…

माझा पहिला चित्रपट हिट झाल्यानंतरही, कोणीही मला कास्ट करतं नव्हतं. यामागचं मुख्य कारण म्हणजे माझा लूक…तू लहान मुलांसारखा दिसतो, तुझ्यासारख्या मुलांसाठी आम्ही स्क्रिप्ट लिहित नाही. असे अनेक अनुभव मला आले आहेत. दरम्यान, ‘जब वी मेट’नंतर २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कमिने’ चित्रपटात शाहिदचा नवा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळाला. अलीकडच्या सगळ्या चित्रपटांमध्ये शाहिद कपूरचा कल वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याकडे असतो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shahid kapoor says he fought to wear glasses in jab we met was asked how will a hero sing with glasses sva 00

First published on: 24-09-2023 at 11:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×