Premium

“आयुष्यातील सर्वात वाईट दिवस…” शाहिद कपूर म्हणाला, ऐश्वर्या रायबरोबर ‘ताल’ चित्रपटाचे शूट करताना…

शाहिद कपूरने सांगितला ऐश्वर्या रायबरोबर ‘ताल’ चित्रपटाचे शूटिंग करतानाचा किस्सा

shahid kapoor and aishwarya rai taal movie
शाहिद कपूरने सांगितला ऐश्वर्या रायबरोबर 'ताल' चित्रपटाचे शूटिंग करतानाचा किस्सा ( फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

शाहिद कपूर सध्या त्याच्या आगामी ‘ब्लडी डॅडी’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात शाहिद नेहमीपेक्षा हटके भूमिका साकारणार आहे. सध्या तो ‘ब्लडी डॅडी’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून यासाठी शाहिद अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान शाहिदने ऐश्वर्या रायबरोबर ‘ताल’ चित्रपटाचे शूटिंग करताना कसा अनुभव आला याबाबत खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’ चित्रपट पाहता येणार फक्त ९९ रुपयांत; जाणून घ्या कधी आणि कुठे?

शाहिद कपूरने २००३ साली ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून पदार्पण केले, परंतु एकेकाळी शाहिद बॉलीवूडमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करायचा. ऐश्वर्याबरोबर ‘कहीं आग लगे लग जावे’ या गाण्यावर शाहिदने डान्स केला होता. अभिनेत्याने ऐश्वर्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता याबाबत खुलासा केला आहे.

हेही वाचा : “वरुण सूदशी ब्रेकअप केलं, कारण…” दिव्या अग्रवालने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली “अपूर्वला भेटले अन्…”

शाहिद म्हणाला, गाण्याच्या शूटिंगसाठी जात असताना माझा अपघात झाला होता. जेव्हा मी सेटवर पोहोचलो तेव्हा माझी परिस्थिती खूपच वाईट होती, पण जेव्हा चांगले शॉट शूट झाले तेव्हा मी खूप आनंदी झालो. मला अजूनही आठवते, ज्या दिवशी गाण्याच्या शूटिंगच्या तारखा होत्या तेव्हा मी बाईकवरून जात असताना पडलो त्यानंतर सेटवर पोहोचल्यावर मी खूप घाबरलो होतो.

हेही वाचा : शुबमन गिलबरोबर रोमॅंटिक फोटो शेअर करणारी ‘ती’ मुलगी कोण? नेटकरी म्हणाले, “सारा भाभी…”

शाहिद पुढे म्हणाला, “बाईकवरून पडल्यावर मला समजलेच नाही नेमके काय झाले? तो दिवस कायम माझ्या आयुष्यातील एक वाईट दिवस म्हणून कायम लक्षात राहिल.” ‘ताल’ चित्रपटाआधी शाहिदने शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांच्या ‘दिल तो पागल है’ हा चित्रपटात सुद्धा बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले होते.

दरम्यान, शाहिदचा आगामी ‘ब्लडी डॅडी’ हा चित्रपट ९ जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहिदसोबत रोनित रॉय, संजय कपूर, राजीव खंडेलवाल, डायना पेंटी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shahid kapoor shares recalls shooting with bollywood actress aishwarya rai for taal movie sva 00