Pathaan First Trailer Release : दीपिका पदुकोण व शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला. चित्रपटामधील ‘बेशरम रंग’ गाण्यामध्ये दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीचा वाद चर्चेत राहिला. त्यानंतर चित्रपटामधील ‘झुमे जो पठाण’ हे गाणंही प्रदर्शित झालं. त्यानंतर चित्रपटाच्या ट्रेलरकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेरीस चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’च्या दोन गाण्यांमध्ये दीपिका व शाहरुखची केमिस्ट्री पाहायला मिळली. आता ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक अगदी भारावून गेले आहेत. ट्रेलरमध्ये शाहरुख व दीपिकाचे अ‍ॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत. तसेच जॉन अब्राहमही यामध्ये भलताच भाव खाऊन गेला आहे.

Akshay Kumar
‘सरफिरा’ चित्रपटातील ‘तो’ सीन करताना अक्षय कुमारला आठवला वडिलांच्या निधनाचा प्रसंग अन् मग…; अभिनेत्याने सांगितलेला वाचा किस्सा
Shahrukh Khan
“शाहरुख खानने ‘कभी अलविदा ना कहना’मध्ये माझ्या भूमिकेची नक्कल केली”, पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा
dharmaveer 2 anand dighe movie first teaser
“ज्यांच्या घरातली स्त्री दुःखी त्याची बरबादी…”, ‘धर्मवीर २’चा टीझर प्रदर्शित! उलगडणार आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट
tu bhetashi navyane subodh bhave new marathi serial
सुबोध भावेच्या नवीन मालिकेत कोण असेल खलनायिका, वर्षभराने छोट्या पडद्यावर परतणार, कोण आहे ‘ती’ अभिनेत्री?
Nita Ambani Cries Hugging Rohit Sharma Video
नीता अंबानी रोहित शर्माला मिठी मारून रडल्या, तर सूर्याला.. राधिका- अनंतच्या संगीत सोहळ्यातील नवा Video पाहिलात का?
Vashu Bhagnani unpaid dues of crew
“स्वतः ऐशोआरामात…”, FWICE च्या अध्यक्षांचा रकुल प्रीतच्या सासऱ्यांवर संताप; दिग्दर्शक अन् कामगारांचे लाखो रुपये थकवले
Kalki 2898AD
‘कल्की 2898 एडी’च्या दिग्दर्शकाचा प्रेक्षकांना सुखद धक्का; प्रभास, बिग बींसह दिसला ‘हा’ सुपरस्टार
Junaid khan talks about maharaj experience
“मला माहित आहे की माझ्यात…”, पदार्पणाच्या ‘महाराज’ चित्रपटात स्वतःच्या कामाचा आमिर खानच्या मुलाने केला रिव्ह्यू

पाहा ट्रेलर

हेही वाचा – “पठाणचा ट्रेलर पाहून मी…” ४ वर्षांनी ॲक्शनपटातून कमबॅक करणाऱ्या शाहरुख खानचा खुलासा

भारतावर हल्ला करण्यासाठी आलेल्या जॉनशी दोन हात करताना शाहरुख या ट्रेलरमध्ये दिसत आहे. तर शाहरुखबरोबर दीपिकाही भारतावर होणारा हल्ला टाळण्यासाठी लढताना दिसत आहेत. ट्रेलरमध्ये शाहरुखचा अ‍ॅक्शन अवतार थक्क करणारा आहे. तर दीपिकाच्या अ‍ॅक्शन सीन्सनेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा – ‘पठाण’ आणि दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून वाद; सेन्सॉर बोर्डाचा मोठा निर्णय

चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे. वयाच्या ५७व्या वर्षी शाहरुख करत असलेलं काम त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. शाहरुखने या चित्रपटासाठी त्याच्या शरीरयष्टीवर अधिकाधिक मेहनत घेतली आहे. तर ट्रेलर पाहिल्यानंतर दीपिकाही या चित्रपटामध्ये भाव खाऊन जाणार अशी चिन्ह दिसत आहेत. सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. बहुचर्चित ‘पठाण’ २५ जानेवारीला बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.