"मी ५७ वर्षांचा आहे पण..." शाहरुख खानने मुलाखतीदरम्यान व्यक्त केली मनातील खदखद | shahrukh khan at red sea international film festival says he wanted to do an action film | Loksatta

“मी ५७ वर्षांचा आहे पण…” शाहरुख खानने मुलाखतीदरम्यान व्यक्त केली मनातील खदखद

सौदीमध्ये पार पडलेल्या ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये शाहरुख खानला आमंत्रित करण्यात आलं

“मी ५७ वर्षांचा आहे पण…” शाहरुख खानने मुलाखतीदरम्यान व्यक्त केली मनातील खदखद
शाहरुख खान (इंडियन एक्सप्रेस)

किंग खान शाहरुख खान हा त्याच्या आगामी ‘पठाण चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. तब्बल ३ वर्षांनी शाहरुख रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या चित्रपटासाठी त्याचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत. याशिवाय शाहरुख सध्या सौदीमध्ये ‘डंकी’ या त्याच्या पुढील चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेला होता. चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यावर त्याने मक्केतील मशिदीला भेट देऊन तिथे प्रार्थनादेखील केली. त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

सौदीमध्ये असल्याने शाहरुखला आणखी एका प्रतिष्ठित कार्यक्रमात आमंत्रित केलं होतं. सौदीमध्ये पार पडलेल्या ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये शाहरुख खानला आमंत्रित करण्यात आलं होतं. शाहरुखबरोबरच अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनेदेखील या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास हजेरी लावली. या सोहळ्यात शाहरुखला चित्रपटक्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कारही देण्यात आला.

आणखी वाचा : शाहरुख खानने दिली मक्का मशिदीला भेट, प्रार्थना करतानाचे फोटो व्हायरल; कारण आहे एकदम खास

या सोहळ्याच्या मंचावर शाहरुखची एक छोटीशी मुलाखतही घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये शाहरुखला पुढे कोणत्या धाटणीचे चित्रपट करायचे आहेत हे त्याने स्पष्ट केलं. या मुलाखतीचा एक छोटा भाग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात शाहरुख म्हणाला, “मी आजवर कोणताही अॅक्शनपट केलेला नाही. मी खलनायक साकारला, मी प्रेमकहाणी केली, शिवाय काही सामाजिक मुद्द्यांना हात घालणाऱ्या कथा केल्या. मला ५७ वर्षांचा झालो आहे, पण आजवर कुणीच अॅक्शनपटात घेतलं नाही. त्यामुळे मला आता ‘मिशन इम्पॉसिबल’सारखे जबरदस्त अॅक्शन असणारे चित्रपट करायचे आहेत. गेल्या काही वर्षात माझ्या कंपनीने व्हीएफएक्स आणि इतर बाबतीत ज्या गोष्टीत प्रगती केली आहे त्याचा वापर करून मी एखादा अॅक्शन चित्रपट करणार आहे. तरूणांना, माझ्या मुलांना असे चित्रपट आवडतात आणि पठाण हा एक अॅक्शनपटच आहे.”

शाहरुखचा ‘पठाण’ २०२३ च्या जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. शिवाय दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्याबरोबर शाहरुख ‘डंकी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये शाहरुखबरोबर अभिनेत्री तापसी पन्नूही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘डंकी’ हा चित्रपट पुढच्यावर्षी डिसेंबरमध्ये चित्रपटगृहात धडकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 11:03 IST
Next Story
शाहरुख खानने दिली मक्केतील मशिदीला भेट, प्रार्थना करतानाचे फोटो व्हायरल; कारण आहे एकदम खास