बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टारकिड्सच्या यादीत सामील असलेली शाहरुख खानची मुलगी सुहाना खान कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. तिच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी अनेकजण तिच्यावर लक्ष ठेऊन असतात. पण आता सुहानाचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा सुहाना खानबरोबर दिसत आहे आणि व्हिडीओमध्ये त्या दोघांमधलं बॉन्डिंग पाहिल्यानंतर चाहते त्यांच्याबद्दल चर्चा करू लागले आहेत. अलीकडेच सुहाना खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून समोर आला. या व्हिडीओमध्ये ती तान्या श्रॉफच्या वाढदिवसाच्या पार्टीतून बाहेर येताना दिसत आहे. तान्या ही सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीची खास मैत्रीण आहे. आणखी वाचा : Video: “ही कोण…” सुहाना खानला मागे टाकत तिच्याबरोबरच्या ‘त्या’ व्यक्तीची चर्चा या व्हिडीओमध्ये दिसत आहे की सुहानाने या पार्टीत ऑफ-शोल्डर गाऊन परिधान केला आहे. पार्टी झाल्यावर ती तिथून निघत असताना तान्या आणि अगस्त्य नंदा तिला गाडीपर्यंत सोडायला आले आणि अगस्त्यने अत्यंत काळजीने सुहानाला गाडीत बसवून दिलं. सुहाना गाडीत बसत असताना अगस्त्याने तिला फ्लाइंग किस दिली. अगस्त्य आणि सुहाना खानचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. अगस्त्यने सुहानाला फ्लाइंग किस देणं हे सगळ्यांनाच अनपेक्षित असल्याने या व्हिडीओवर कमेंट करत ते एकमेकांना डेट करत आहेत का? अशा चर्चा करू लागले आहेत. हेही वाचा : Video: शाहरुख खानच्या लेकीला नो मेकअप लूकमध्ये पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का, म्हणाले, “सुहाना तर…” मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुहाना खान, आर्यन खान, नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा लहानपणापासून एकमेकांचे जवळचे मित्र आहेत आणि अनेक कार्यक्रमांना ते एकत्र दिसले आहेत. तर आता लवकरच सुहाना आणि अगस्त्य झोया अख्तरच्या 'आर्चिस' या चित्रपटातून एकत्र अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.