शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या बक्कळ कमाई करत आहे. चार वर्षांनंतर शाहरुखने रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं. त्याचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर तुफान गर्दी केली. तर त्याच्या चाहत्यांनी चित्रपट प्रदर्शित होताच मोठा आनंद साजरा केला. ‘पठाण’ चित्रपटाबाबत एक नवी माहिती आता समोर आली आहे.

आणखी वाचा – Video : ‘पठाण’ चित्रपट सुरू असतानाच चाहत्यांनी थिएटरमध्येच फोडले फटाके अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

शाहरुखचे चाहते ‘पठाण’ पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये जात आहेत. तर दुसरीकडे चित्रपटाची कमाईही वाढत आहे. पण शाहरुखच्या चाहत्यांसाठी आता आणखी एक खुशखबर आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच प्रेक्षकांना ‘पठाण’ ओटीटीवरही पाहता येईल.

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘पठाण’ प्रदर्शित होणार?

एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ९० दिवसांनीच तो चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केला जातो. त्यामुळे ‘पठाण’ ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी प्रेक्षकांना ९० दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. अॅमोझॉन प्राइमवर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. लेट्ससिनेमा नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.

आणखी वाचा – Video : ‘पठाण’मधील ‘तो’ सीन सुरू असतानाच इंडोनेशियाच्या थिएटरमध्ये प्रेक्षकांनी स्क्रिनकडे घेतली धाव; घडलं असं काही की…

‘पठाण’ हिंदीसह तमिळ, तेलुगू भाषेमध्येही प्रदर्शित करण्यात आला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अगदी कहरच केला. कोणी चित्रपटगृहाबाहेर फटाके फोडले तर कोणी शाहरुखच्या पोस्टरला दुधाचा अभिषेक केला. इतकंच नव्हे तर काही चित्रपटगृहांबाहेर चाहत्यांनी ढोल-ताशांच्या तालावर नाचायला सुरुवात केली. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात ५५० कोटींची कमाई केली आहे.