scorecardresearch

‘पठाण’साठी शाहरुख खानने घेतलं ‘इतके’ कोटी मानधन, दीपिका पदुकोण व जॉन अब्राहमला मिळाले पाचपट कमी पैसे

‘पठाण’ चित्रपटासाठी शाहरख खानने घेतलं कोट्यवधी रुपयांचं मानधन, रक्कम वाचून तुम्हीही व्हाल थक्क

‘पठाण’साठी शाहरुख खानने घेतलं ‘इतके’ कोटी मानधन, दीपिका पदुकोण व जॉन अब्राहमला मिळाले पाचपट कमी पैसे

दीपिका पदुकोण व शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला. चित्रपटामधील ‘बेशरम रंग’ गाण्यामध्ये दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीचा वाद चर्चेत राहिला. पण या सगळ्या वादादरम्यान ‘पठाण’च्या ट्रेलरला मात्र लाखो व्ह्युज मिळाले आहेत. आता या चित्रपटाच्या प्रतिक्षेमध्ये चाहते आहेत.

आणखी वाचा – लेकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये आदेश बांदेकरांना ओळखणंही झालं कठीण, आधी असे दिसायचे महाराष्ट्राचे लाडके भावोजी

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शाहरुख-दीपिकासह जॉन अब्राहमचा एक वेळाच लूक पाहायला मिळाला. हा चित्रपट सुपरहिट ठरणार असल्याचं प्रेक्षक म्हणत आहेत. दरम्यान शाहरुखने या चित्रपटासाठी कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. तर शाहरुखच्या तुलनेमध्ये दीपिका व जॉनचं मानधन फारच कमी आहे.

शाहरुख खानने किती घेतलं मानधन?

‘सीएनबीसी टीव्ही १८’च्या वृत्तानुसार शाहरुखने या चित्रपटासाठी तब्बल १०० कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. चित्रपटातील इतर कलाकारांच्या तुलनेमध्ये हे शाहरुखचं मानधन खूप जास्त आहे. दीपिकाने ‘पठाण’साठी १५ कोटी तर जॉनने २० कोटी रुपये मानधन घेतलं आहे. म्हणजेच मानधनाच्या बाबतीत शाहरुख टॉपच्या कलाकारांमध्ये पुढे आहे.

शाहरुखने या चित्रपटासाठी त्याच्या शरीरयष्टीवर अधिकाधिक मेहनत घेतली आहे. तर ट्रेलर पाहिल्यानंतर दीपिकाही या चित्रपटामध्ये भाव खाऊन जाणार अशी चिन्ह दिसत आहेत. सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. बहुचर्चित ‘पठाण’ २५ जानेवारीला बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 19:11 IST

संबंधित बातम्या