"दीपिका व मला किस करण्यासाठी..." शाहरुख खानने केलेलं 'ते' वक्तव्य चर्चेत | shahrukh khan deepika padukone off screen chemistry actor said we find chance to kiss each other see details | Loksatta

“दीपिका व मला किस करण्यासाठी…” शाहरुख खानने केलेलं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

शाहरुख खानने दीपिका पदुकोणबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत, काय म्हणाला किंग खान?

shahrukh khan deepika padukone
शाहरुख खानने दीपिका पदुकोणबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत, काय म्हणाला किंग खान?

शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या बक्कळ कमाई करत आहे. चार वर्षांनंतर शाहरुखने रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं. त्याचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर तुफान गर्दी केली. ‘पठाण’चे शो अजूनही हाऊसफुल आहेत. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या सहा दिवसांमध्येच जगभरात ६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे.

आणखी वाचा – “शाहरुख खान भारताचा…” ‘पठाण’ सुपरहिट ठरल्यानंतर किंग खानबाबत जॉन अब्राहमचं मोठं वक्तव्य

दरम्यान या चित्रपटामध्ये शाहरुखसह जॉन अब्राहमच्या भूमिकेचीही जोरदार चर्चा सुरू आहे. जॉनने या चित्रपटामध्ये साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. ‘पठाण’ चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर या चित्रपटाची संपूर्ण टीम पहिल्यांदाच प्रसार माध्यमांसमोर आली. यावेळी शाहरुखने अगदी मजेशीर अंदाजात दीपिकाबाबत केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

काय म्हणाला शाहरुख खान?

शाहरुख या पत्रकार परिषदेमध्ये अगदी खुश दिसत होता. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच त्याने मजेशीर अंदाजात म्हटलं की, “दीपिका व माझं तर तुम्हाला माहितीच आहे. आम्हाला किस करण्यासाठी, प्रेम करण्यासाठी तसेच एकमेकांना मिठी मारण्यासाठी एक कारणच हवं असतं. तुम्ही जे प्रश्न विचारणार त्याला उत्तर म्हणून मी दीपिकाच्या हाताला किस करणार.”

शाहरुखचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनी यावेळी एकच गोंधळ केला. शाहरुख व दीपिकाची ऑफस्क्रिन केमिस्ट्रीही यावेळी पुन्हा एकदा दिसून आली. शिवाय या पत्रकार परिषदेदरम्यान ‘पठाण’ चित्रपटाला मिळत असलेलं यश आणि प्रतिसाद पाहून दीपिकाला अश्रू अनावर झाले. तर शाहरुखने यावेळी जॉनला आनंदाच्या भरात किस केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 11:51 IST
Next Story
भर कार्यक्रमात दीपिका पदुकोणला झाले अश्रू अनावर, म्हणाली, “आज संपूर्ण जग…”