scorecardresearch

शाहरुख खानच्या ‘पठाण’ने तीन दिवसांमध्येच जगभरात कमावले इतके कोटी, खरी आकडेवारी समोर

तीन दिवसांमध्येच ‘पठाण’ चित्रपटाने जगभरात किती कोटी रुपये कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

Pathaan Box Office Pathaan Box Office Worldwide
तीन दिवसांमध्येच 'पठाण' चित्रपटाने जगभरात किती कोटी रुपये कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

Pathaan Box Office Collection : शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. २५ जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होताच किंग खानच्या चाहत्यांनी देशभरात जल्लोष साजरा केला. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर गर्दी करत आहेत. तीन दिवसांमध्ये ‘पठाण’ने किती कमाई केली हे आता समोर आलं आहे. तसेच जगभरातही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘पठाण’ चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘पठाण’ चित्रपटावरुन प्रदर्शनापूर्वीच बराच वाद रंगला. दीपिकाची ‘बेशरम रंग’ गाण्यामधील भगवी बिकिनी तर वादाचा विषय ठरली. पण याचा चित्रपटावर कोणताच परिणाम झाला नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शाहरुख प्रेक्षकांची मनं जिंकण्यामध्ये पुन्हा एकदा यशस्वी ठरला आहे.

विश्लेषक रमेश बाला यांच्या ट्वीटनुसार ‘पठाण’ने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी देशभरात ३४ ते ३६ कोटी रुपये कमाई केली आहे. तसेच जगभरात या चित्रपटाने आतापर्यंत ३०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. शाहरुख व दीपिकासाठी हे मोठं यश आहे. ‘दंगर’, ‘बाहुबली २’, ‘केजीएफ २’ सारख्या चित्रपटांप्रमाणेच ‘पठाण’ही कमाई करत आहे.

आणखी वाचा – Pathan Box Office Collection : ‘पठाण’ चित्रपटाने मोडला ‘KGF 2’ चा रेकॉर्ड, तिसऱ्या दिवशी कमावले इतके कोटी

आता या विकेण्डचा फायदाही ‘पठाण’ला होईल तसेच चित्रपटाच्या कमाईमध्ये आणखीन वाढ होणार असं बोललं जात आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ‘पठाण’ने ५४ कोटी रुपयांचा गल्ला जमावला. तर जगभरात चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०६ कोटी रुपये कमावले. करोना काळानंतर सर्वाधिक कमाई करणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. आता ‘पठाण’च्या कमाईमध्ये आणखीन किती वाढ होणार? हे पाहणं रंजक ठरेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 12:08 IST
ताज्या बातम्या