बॉक्स ऑफिसवर फक्त 'पठाण'चा डंका! तब्बल २० रेकॉर्ड मोडीत काढत किंग खानचा जबरदस्त कमबॅक | shahrukh khan deepika padukone starrer pathaan movie broke 20 different records on box office | Loksatta

बॉक्स ऑफिसवर फक्त ‘पठाण’चा डंका! तब्बल २० रेकॉर्ड्स मोडीत काढत किंग खानचा जबरदस्त कमबॅक

प्रेक्षकांना तर या चित्रपटाने वेड लावलंच आहे पण बॉक्स ऑफिसवर या ‘पठाण’ने इतिहास रचला आहे

pathaan records
फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम

२५ जानेवारी या दिवशी ‘पठाण’ या बहुचर्चित चित्रपटातून किंग खान शाहरुख खानने तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर हजेरी लावली. शाहरुखच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. आता पठाणच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे अंदाजे आकडे समोर आले आहेत. बुधवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली.

‘पठाण’ वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत होता. भगव्या बिकिनीवरून पेटलेला वाद किंवा सलमानची यात पाहायला मिळणारी झलक अशा वेगवेगळ्या कारणांसाठी हा चित्रपटात चर्चेत होता. शिवाय यातील शाहरुख आणि सलमानमधल्या त्या सीनची भरपूर चर्चा रंगत आहे. खूप वर्षांनी प्रेक्षकांना त्यांचे लाडके सुपरस्टार एकत्र मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले आहेत. प्रेक्षकांना तर या चित्रपटाने वेड लावलंच आहे पण बॉक्स ऑफिसवर या ‘पठाण’ने इतिहास रचला आहे.

आणखी वाचा : भाईजानच्या चाहत्याने शाहरुख खानला डिवचलं; किंग खान ट्वीट करत म्हणाला, “सलमान म्हणजे…”

एक दोन नव्हे तर या चित्रपटाने तब्बल २० रेकॉर्डस मोडले आहेत. नेमके हे रेकॉर्ड आहेत तरी कोणते तेच आपण जाणून घेणार आहोत. हे रेकॉर्ड्स पुढीलप्रमाणे आहेत :
१. दिवसाला सर्वाधिक कामाई करणारा चित्रपट म्हणून ‘पठाण’चं नाव पुढे आलं आहे.
२. बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ५५ कोटीपेक्षा अधिक कमाई करणारा हा एकमेव हिंदी चित्रपट आहे.
३. बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी ७० कोटीपेक्षा अधिक कमाई करणारा हा एकमेव हिंदी चित्रपट आहे.
४. बॉक्स ऑफिसवर सर्वात जलद गतीने दुसऱ्या दिवशी १०० कोटी हा आकडा पार करणारा हा चित्रपट आहे.
५. ‘पठाण’ हा पहिल्या २ दिवसात ५० कोटीहून अधिक कमाई करणारा एकमेव हिंदी चित्रपट आहे.
६.प्रत्येक फिल्म सर्किटमध्ये या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली आहे.
७. ‘पठाण’ हा पहिल्या दिवशी सर्वात जास्त ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेला चित्रपट ठरला आहे.
८. कोविड काळानंतर पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला हिंदी चित्रपट आहे.
९. ‘पठाण’ने सार्वजनिक सुट्टी नसतानाही पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई केली आहे.
१०. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा असा पहिला चित्रपट आहे ज्याने दुसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई केली आहे.

११.बॉक्स ऑफिसवर ५० कोटीपेक्षा अधिक कमाई पहिल्या दिवशी करणारा यश राज फिल्म्स हा एकमेव बॅनर आहे.
१२. यश राज बॅनरने गेल्या ४ वर्षातील भरपाई आणि त्यावर ५० कोटी अधिक ‘पठाण’च्या माध्यमातून कमावले आहेत.
१३. पहिल्याच दिवशी ५० कोटीहून अधिक कमाई करणारा यश राजचा हा सलग तिसरा चित्रपट आहे.
१४. ‘एक था टायगर’ आणि ‘वॉर’नंतर ‘यश राज फिल्म्स’ बॅनरखाली बनलेला हा तिसरा स्पाय चित्रपट आहे ज्याने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली आहे.
१५. शाहरुख खानच्या कारकीर्दीतील पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणजे ‘पठाण’.
१६. दीपिका पदूकोणच्या कारकीर्दीतील पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणजे ‘पठाण’
१७. जॉन अब्राहमच्या कारकीर्दीतील पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणजे ‘पठाण’
१८. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या कारकीर्दीतील पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणजे ‘पठाण’
१९. ‘पठाण’ हा ‘यश राज फिल्म्स’च्या कारकीर्दीतील पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.
२०. ‘पठाण’ हा ‘यश राज स्पाय युनिव्हर्समधील पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

विशेष म्हणजे पठाण चित्रपटाने दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या KGF Chapter-2 चा रेकॉर्डही मोडला आहे. पहिल्या तीन दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून केजीएफ २ हा चित्रपट होता. पण पठाणने या चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. KGF Chapter 2 या चित्रपटाला मागे टाकत पठाणने बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये आघाडी घेतली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 17:52 IST
Next Story
शाहरुख खानच्या ‘पठाण’ने आतापर्यंत कमावले इतके कोटी, चित्रपटाची कमाई पाहून अभिनेता म्हणतो, “आता पुन्हा…”