"शाहरुख खान हा भारताचा टॉम क्रूझ..." अमेरिकी पत्रकाराच्या वक्तव्यावर किंग खानचे चाहते नाराज | shahrukh khan fan upset about american reporter calls shahrukh khan as indias tom cruise | Loksatta

“शाहरुख खान हा भारताचा टॉम क्रूझ…” अमेरिकी पत्रकाराच्या वक्तव्यावर किंग खानचे चाहते नाराज

भारताबाहेरील सेलिब्रिटीजनीसुद्धा ‘पठाण’चं कौतुक केलं आहे

shahrukh khan tom cruise
फोटो : लोकसत्ता ग्राफीक टीम

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा गेले काही दिवस सातत्याने चर्चेत आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली. त्यानंतर आजवर या चित्रपटाने ६०० कोटीहून अधिक कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने इतिहास रचला आहे.

कोणत्याही मुलाखतीशिवाय केवळ ट्रेलर, गाणी आणि थेट चाहत्यांशी संवाद यांच्या माध्यमातून शाहरुख आणि ‘पठाण’ची टीमने या चित्रपटाचं प्रमोशन केलं. चित्रपटाच्या जबरदस्त कमाईनंतर यातील कलाकार आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी एकत्रित येऊन मीडियाशी संवाद साधला. सर्व स्तरातून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कलाकार मंडळी, समीक्षक सगळ्यांनीच चित्रपटाचं कौतुक केलं आहे. भारताबाहेरील सेलिब्रिटीजनीसुद्धा ‘पठाण’चं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा : श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली; अभिनेत्रीचा इन्स्टाग्राम व्हिडिओ होतोय व्हायरल

एका अमेरिकी पत्रकाराने तर शाहरुख खानची तुलना थेट हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझशी केल्याने शाहरुखचे चाहते नाराज झाले आहेत. अमेरिकन पत्रकार स्कॉट मेंडेल्सन यांनी शाहरुख खानच्या ‘पठाण’बद्दल एक लेख लिहिला आहे, तो लेख त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. तो शेअर करताना त्यांनी लिहिलं, “शाहरुख खान हा भारताचा टॉम क्रूझ आहे, पठाणसारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन त्याने कदाचित बॉलिवूडला वाचवलं आहे.” स्कॉट यांनी या ट्वीटमध्ये शाहरुख खानला भारताचा टॉम क्रूझ म्हंटल्याने शाहरुख खानचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत.

एका ट्विटर युझरने स्कॉट यांच्या या ट्वीटवर त्यांना उत्तर दिलं आहे. त्या ट्विटर युझरने लिहिलं कि, “तुम्ही तुमच्या विधानात भावनिक चूक केली आहे. शाहरुख खान हा आमच्यासाठी एक भावनिक मुद्दा आहे. तो सर्वश्रेष्ठ आहे! मला टॉम क्रूझ आवडत असला तरी तुम्ही त्याला अमेरिकेचा शाहरुख खान म्हणून संबोधलं तर ते मला जास्त आवडेल.” स्कॉट यांनी ट्विटर युझरच्या या कॉमेंटची दखलही घेतली आहे. ‘पठाण’ हा बॉक्स ऑफिसवर चांगलाच सुपरहीट ठरला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 18:07 IST
Next Story
सिद्धार्थ-कियाराचा मेहंदी सोहळा संपन्न? जाणून घ्या व्हायरल फोटोमागील सत्य