शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. २५ जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होताच शाहरुखच्या चाहत्यांनी अगदी कहर केला. कोणी चित्रपटगृहाबाहेर फटाके फोडले तर कोणी शाहरुखच्या पोस्टरला दुधाचा अभिषेक केला. इतकंच नव्हे तर काही चित्रपटगृहांबाहेर चाहत्यांनी ढोल-ताशांच्या तालावर नाचायला सुरुवात केली. आता एक वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – शाहरुख खानच्या ‘पठाण’ने आतापर्यंत कमावले इतके कोटी, चित्रपटाची कमाई पाहून अभिनेता म्हणतो, “आता पुन्हा…”

upsc student surprised father with upsc 2023 result in his office then what happened you will get cry watch viral video
या आनंदाला तोड नाही! UPSC निकालानंतर वडिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचला लेक अन्…; VIDEO पाहून पाणावतील तुमचेही डोळे
IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा

शाहरुखचे जगभरातील चाहते ‘पठाण’ चित्रपट पाहून भारावले आहेत. त्याच्या जबरा फॅननी तर संपूर्ण थिएटरच बुक केलं असल्याचीही माहिती समोर आली होती. आता तर ‘पठाण’ चित्रपट सुरू असताना चाहत्यांनी चित्रपटगृहामध्येच फटाके फोडले. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

‘पठाण’च्या यशानंतर शाहरुखने #AskSRK ट्विटर सेशन घेतलं. या सेशनद्वारे चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. दरम्यान यावेळी एका चाहत्याने एक व्हिडीओ ट्वीट केला. या व्हिडीओमध्ये चाहते चित्रपटगृहामध्येच फटाके फोडताना दिसत आहेत. चित्रपट सुरू असतानाच हा प्रकार घडला.

आणखी वाचा – Video : उर्फी जावेदचं ‘ते’ कृत्य कॅमेऱ्यात कैद, असा ड्रेस परिधान करत स्वतःच म्हणाली, “तो कोण आहे ज्याने…”

मात्र हा प्रकार नेमका कुठे घडला हे अद्यापही समोर आलेलं नाही. “हा वेडेपणा कसा वाटला?” असं त्या चाहत्याने शाहरुखला विचारलं. मात्र यावेळी शाहरुखने या व्हिडीओला उत्तर देणं टाळलं. शाहरुखच्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ३०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. शाहरुख व दीपिकासाठी हे मोठं यश आहे.